Breaking News

Tag Archives: solapur

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने विविध योजनांच्या माध्यमातून रेवडी वाटपाच्या योजना सतत जाहिर करत आहे. तसेच विरोधातील महाविकास आघाडीला हादरे देण्याच्या अनुषंगाने काही योजनाही भाजपाकडून आखण्यात येत आहे. मात्र राज्यातील प्रत्येक विधानसभा जिंकायचीच म्हणून भाजपाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देणार श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र चा दर्जा देण्याची घोषणा

परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्त्वपूर्ण विचार संत शिरोमणी सावता महाराज यांनी मांडला. तसेच आपलं कर्तव्य व कर्म करत राहावे ही शिकवण त्यांनी दिली. संत शिरोमणी सावता महाराज विकास आराखड्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नाशिक, छ, संभाजीनगर, सोलापूरात कांदा महाबँक सुरु करा अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी …

Read More »

हवामान खात्याने पुढील २४ तासासाठी मुंबईसह या जिल्ह्यांना दिला पावसाचा रेड अलर्ट ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना दिला पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांष जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. त्यातच मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर पुणे शहरात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागात घरांनी पाणी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …मोदींना निवडणूक आली की महाराष्ट्र आठवला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे …

Read More »

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत …

Read More »

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. …

Read More »

सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस

एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …

Read More »

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »