महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एक नवी प्रथा निर्माण करण्यात आली असून या प्रथेनुसार विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो पण त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नव्या प्रथे प्रमाणे पुरवणी मागण्या सादर करायच्या आणि त्या अधिवेशन संपेपर्यंत मंजूर करून घ्यायचे. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नागपूरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली
राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांवर आज विधान परिषदेत बोलताना केला. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्या …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर
राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …
Read More »विधानसभेत मंत्री उदय सामंत यांच्याकडून पुरवणी मागण्या सादरः लाडक्या बहिणीसाठी १४०० कोटी ३५ हजार ७८८ कोटींच्या मागण्या सादर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीने माझी लाडकी बहिण योजनेतील रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने सोमवारी ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यात आपल्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहिण योजनेसाठी १,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावेळी पुरवणी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, ९४ हजार कोटी…समाजाला किती वाटा मिळणार ? भंडारा जिल्ह्यातील शिक्षक व पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरा
भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची १५०० पदे रिक्त आहेत, सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पद भरती करत नाही. शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कुठून राहणार असा प्रश्न उपस्थित करुन ही रिक्त पदे किती दिवसात भरणार याची हमी सरकारने द्यावी. साकोली, लाखणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्ग …
Read More »अजित पवार यांनी मांडल्या भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या
प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूरात सुरुवात झाली. या अधिवेशनानंतर पुढील काही महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणूका आणि त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याच्या खर्चाचा अंदाज धरून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या …
Read More »पावसाळी अधिवेशनाच्या १ ल्या दिवशी ‘या’ विभागांसाठी केली निधीची तरतूद २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या -सर्वाधिक निधी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाला
शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिलेच असलेल्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ हजार ८२६.७२ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर चर्चा होवून त्यानंतर मंजूर करण्यात येणार आहेत. मात्र यापैकी सर्वाधिक निधी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव …
Read More »पुरवणी मागण्यात कर्जमाफी, जनआरोग्य योजना, औषध खरेदीसाठी दिला खास निधी २९ हजार कोटींच्या निधीत सहकार व पणन, सामाजिक न्याय आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य
मुंबई: विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय तरतूदीनुसार लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून पुरवणी मागण्या आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, सहकार व पणन, सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. तर सामाजिक न्याय, आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागाला …
Read More »मान्य केलेल्या पुरवण्या मागण्या रद्द करुन नंतर चर्चा घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यासह विरोधकांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya