राज्यात मागील २४ तासांमध्ये (८ जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड २०.८ मिमी, धाराशिव १३.८ मिमी, ठाणे ७.९ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज ८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार
वैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला. धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज भाऊ देशमुख, …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, ..पूरप्रश्नी भाजपा युतीचे मंत्री केंद्राकडे मदत का मागत नाही ? मविआ बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकेल: रमेश चेन्नीथला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून आतापर्यंत काँग्रेस पक्षाने १७२ मतदार संघाचा आढावा घेतला आहे. २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदार संघाचा आढावा पूर्ण होईल. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकुल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून २/३ बहुमताने मविआचे सरकार येईल असा, विश्वास …
Read More »पुढील पाच दिवस पाऊसः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बरसणार कोकण आणि विदर्भात चार दिवस पाऊस राहणार
भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकणसह, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविला आहे. राज्यातील कोकणात एकाबाजूला पावसाने चांगलीच हजेरी लावलेली असली तर दुसऱ्याबाजूला राज्यातील अनेक भागात मात्र …
Read More »राहुल गांधी यांचे आश्वासन, केंद्रात फक्त जनतेचे सरकार आणि योजना…
काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० …
Read More »सोलापूर -चंद्रपूरात तापमान ४२ वर, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस
एकाबाजूला राज्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकिय वातावरण तापत असतानाच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातही निसर्गातील उष्मा भलताच वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या एकूण सहाही महसूली विभागात कधी उष्णतेचा पारा कधी ४०-४२ पार जाताना दिसून येत आहे. तर काही भागात तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. सोलापूर आणि चंद्रपूर येथे ४२.४ अंश …
Read More »पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …
Read More »विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे दिला मुख्यमंत्र्यांना इशारा, …अशी पळवाट सरकारने
वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची माहिती, विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित मान्यता
विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ कोटी ३९९ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकलपांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »नाना पटोले यांची मागणी,… अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या
नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते. सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव आला आहे. विदर्भावर अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, …
Read More »
Marathi e-Batmya