Tag Archives: vijay wadettiwar

विजय वडेट्टीवारांची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी केली मोठी घोषणा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना चार लाखांपर्यंत मदत

मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक वर्षांपासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार यापुढे एसडीआरएफ खाली करण्यात येणार असून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत असल्याचे …

Read More »

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने आतातरी शहाणे व्हावे! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सल्ला

मराठी ई-बातम्या टीम केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात जिल्हा परिषदा आणि नगर परिषदा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत आणि तसा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मनाला अतिशय वेदना होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने आतातरी शहाणे व्हावे असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला …

Read More »

ओबीसी प्रश्नावरून मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काढली भडास सरसकट घ्या नाहीतर निवडणूक पुढे ढकला

मराठी ई-बातम्या टीम नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका न वगळता सरसकट घ्याव्यात आणि इम्पिरिकल डेटा (जातनिहाय वस्तुनिष्ठ माहिती ) देण्यास दोन महिन्याची मुदत द्यावी किंवा २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात करणार आहे. बुधवारी (ता.९) मंत्रालयात पार पडलेल्या …

Read More »

अजित पवार, मुश्रीफ, शिंगणे, वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांची चौकशी न्यायालयाकडे वर्ग करा नुरा कुस्ती टाळून शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याची भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्य सहकारी बँकेतील १ हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांतून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांच्या निर्दोष मुक्ततेवर शिक्कामोर्तब करण्याच्या हेतूने सहकार मंत्र्यांकडे बोगस अपील दाखल करण्यात आले असून नुरा कुस्तीचाच हा प्रकार आहे. सहकार खात्याच्या प्रधान सचिवांपुढे या अपीलाची सुनावणी …

Read More »

दहावी-बारावीच्या या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क सरकारकडून माफ कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर …

Read More »

काँग्रेसच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजार रू. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : प्रतिनिधी कोविड काळात मृत्यूमुखी पावणाऱ्यांच्या वारसांना मदत काय देणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केल्यानंतर त्या वारसांना ५० हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाही मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राने राज्याला पत्र पाठविल्यानंतर ५० हजार ही फारच तुटपुंजी रक्कम असून त्याऐवजी ४ लाख रूपयांची …

Read More »

लस घेतलेल्यांनाही करता येणार एक दिवसाचा लोकल प्रवास राज्य सरकारकडून अखेर रेल्वेला पत्र

मुंबई: प्रतिनिधी शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या उपनगरीय गाड्यांना फक्त लसीचे डोस घेतलेल्या नागरीकांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास देण्यास मान्यता देण्यात येत होती. मात्र दैंनदिन तिकिट मात्र मिळत नव्हते. त्यावर नागरीकांकडून एक दिवसाच्या प्रवासासाठीही तिकीट द्या अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार अखेर आज राज्य सरकारच्या आपतकालीन विभागाने रेल्वेला पत्र लिहीत …

Read More »

पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ७७४ कोटी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच १४ बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८६० कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून …

Read More »

३३ टक्के किंवा त्याहून अधिक शेतीनुकसान झालेल्या बाधितांना मिळणार भरपाई गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी १२२ कोटी मंजूर

मुंबई : प्रतिनिधी गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या …

Read More »

निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …

Read More »