Tag Archives: winter session

अजित पवार यांची माहिती, दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

राज्यात एफ.एल–2 आणि सी.एल–3 परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सदस्य शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी महामंडळ नवीन आठ हजार बस खरेदी करणार कामगारांची देणी देण्यास निधी कमी पडणार नाही

एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे. राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एस.टी. बसेसची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यात तीन हजार आणि दुसऱ्या टप्प्यात पाच हजार बसची खरेदी केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक, इ-चालानबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगट स्थापणार विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्यावेळी दिले आश्वासन

मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले. वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, बिबट्याची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार भविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क

राज्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात एकही मनुष्य मृत्यूमुखी पडणार नाही, यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच बिबट्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हातावर लिहिलेली चिठ्ठी त्या डॉक्टर महिलेचीच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, मोदींनी सरन्यायाधीशांना निवड समितीतून का काढले? निवडणूक सुधारणांप्रश्नी राहुल गांधी यांनी सरन्यायाधीशांना समितीतून काढून टाकण्याच्या मुद्दा उपस्थित केला

संसदेत निवडणूक सुधारणांवर बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर टीका केली आणि नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचे प्रमुख आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रभारी पॅनेलमधून भारताच्या सरन्यायाधीशांना काढून टाकण्याचा त्यांचा इतका हेतू का आहे. “सीजेआयना सरन्यायाधीशांना निवड समितीतून का काढून टाकण्यात आले? आम्हाला …

Read More »

केंद्र सरकारची माहिती, जीएसटी कर संकलनात सात राज्यांचा वाटा जास्त अर्थ मंत्रालयाची संसदेत माहिती

केंद्राकडून विकेंद्रीकरण म्हणून मिळणाऱ्या वाट्यापेक्षा देशातील एकूण जीएसटी कर संकलनात सात राज्यांचा वाटा जास्त आहे, असे सरकारने संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसून येते. अर्थ मंत्रालयाने राज्यसभेला दिलेल्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०२०-२१ आणि २०२४-२५ दरम्यान देशातील एकूण जीएसटी कर गोळा करण्याच्या ४.६% भाग उत्तर प्रदेशचा …

Read More »

हवामान विभागाचा अंदाजः २७-२८ डिसेंबरला राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील …

Read More »

आठवडाभराच्या अधिवेशनात एकूण १९ पैकी १७ विधेयके महायुतीकडून मंजूर विधेयके मंजूर करण्यात महायुतीचा रेकॉर्ड ब्रेक

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा वरवा ज्या पद्धतीने सुरु करण्यात आला होता. अगदी त्याच धर्तीवर आठवडा भराच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने आणि अल्पसंख्य असलेल्या विरोधकाच्या जोरावर १९ पैकी १७ विधेयके मंजूर करून दाखवित एक नवा रेकॉर्ड ब्रेकच केला असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत घर मिळवून देणार कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना

विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री …

Read More »