हवामान विभागाचा अंदाजः २७-२८ डिसेंबरला राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.  त्याचबरोबर हवामान खात्यानेही यासंदर्भात आवाहन केले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड कोरडे वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या हिवाळा ऋतू सुरु असताना राज्यात मध्येच पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आल्याने यामागे ग्लोबल वार्मिगचे कारण सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *