हवामान खात्याकडून नवा अलर्ट जारी या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

मुंबई: प्रतिनिधी

दोनच दिवसांपूर्वी राज्यात ३० ऑगस्टपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा पावसाच्या अनुषंगाने या हवामान विभागाने पुन्हा नव्याने आज इशारा दिला.

आज जारी केलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आज यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील जवळपास सात महानगरपालिकांनी पुढील ४८ तासात अतिवृष्टीचा होणार असल्याचा इशारा नागरीकांना दिला आहे. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात दुपारपर्यत मुसळधार स्वरूपाचा तर दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झालेली असली तरी पाऊस थांबला नाही.  दिवसभरात जालना, बीड, परभणी, अहमदनगर, वाशिम, यवतमाळसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या भागातील अनेक नद्या, नाले आणि कॅनल भरून वाहताना दिसत होते. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

 

 

About Editor

Check Also

गिरिश महाजन यांची माहिती, ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसह, महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत मोठी झेप

अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून हवामान  …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *