सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात ८० रूग्ण ११ तालुक्यात ६ तर शहरातील मृतकांची संख्या १०१ वर

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्यात वाढत असताना या आजाराचे लोण आता ग्रामीण भागातही हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ८० रूग्ण आढळून आले आहे. तर यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ६ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६० वर (शनिवारी रात्रीपर्यंत) पोहोचली असून आतापर्यत १०१ जणांचा मृत्यू (शनिवारी रात्रीपर्यंत) ची नोंद झालेली आहे.
यामध्ये ११ तालुक्यांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधीत रूग्ण हे दक्षिण सोलापूर आणि बार्शीमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *