सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर शहरात काल ९० आज ६७, तर ग्रामीण भागातील संख्या १४८ वर

सोलापूर : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद  झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका रूग्णाचे निदान झाले असून ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या १४९ वर गेली आहे. तर मृतकांची संख्या ११ वर पोहोचली. ग्रामीण भागात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक रूग्ण दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक ६८, तर अक्कलकोट, बार्शी या तालुक्यात प्रत्येकी २२ तर उत्तर सोलापूरमध्ये ११ रूग्णांची नोंद झाली आहे.

शहरात १०२४ रूग्ण आतापर्यत बरे होवून घरी गेले आहेत. तर ७०६ रूग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात ६९ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार ८० टक्के बांधकामे झालेल्या आरोग्य संस्था प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय ठरला मैलाचा दगड

राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थाना युद्धपातळीवर कार्यान्वित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *