अभिनेते राजीव कपूर यांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईः प्रतिनिधी
प्रसिध्द शो-मॅन स्व.राज कपूर यांचे तृतीय पुत्र तथा दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे धाकटे बंधु- अभिनेते राजीव कपूर यांच आज निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
“मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. तर रणधीर यांच्याप्रमाणेच नीतू कपूर यांनी देखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजीव कपूर यांनी वडील राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलं होते.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *