आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम

ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचे काम अद्याप सुरु झाले नाही. तसेच आयोगाला ४५० कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात साडेचार कोटी रूपये दिल्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत फुकटं घावलं आणि गावं सारं धावलं अशी उपरोधिक टीका केली.

वडेट्टीवार हे गोंदिया येथील प्रचार सभेकरीता आले असता त्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता त्यांनी गोपीचंड पडळकर यांची खिल्ली उडवित म्हणाले, “नया नया पंछी, ज्यादा फडफड करता है” असा उपरोधिक टोला लगावला.

गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार सांगत ज्या माणसावर लूटमारी, फसवणूक, शेती ढापने, अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल आहेत, त्या व्यक्तीच्या वक्तव्यावर बोलने चुकीचे ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मागास आयोग ही स्वायंत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात ५ कोटी रुपये टाकले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवावे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागसवर्गीय आयोगावरून पडळकरांनी डागलेल्या तोफेला विजय वडेट्टीवरांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने मंत्री विजय वडेट्टीवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यात नवा वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दरम्यान पडळकरांनी शेलक्या शब्दात मंत्री वडेट्टीवारावर टीका करताना, वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याची टीका केली. त्यामुळे ओबीसी मंत्री जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले.

दरम्यान ओबीसी आरक्षणावरून गोपीचंद पडळकरांनी पहिल्यांदाच काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना लक्ष केल्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आता भाजपा विरूध्द काँग्रेस असा सामना रंगणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पडळकरांना टीकेसाठी नवा गडी सापडला असल्याची चर्चा या निमित्ताने राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *