तब्बल साडे नऊ तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात पुढील चौकशी ईडी कार्यालयात करणार

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानुसार ईडीच्या १० अधिकाऱ्यांच्या पथकाने आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता धाड टाकली. या धाडीनंतर तब्बल साडेनऊ तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आल्यानंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

संजय राऊत यांना ईडी कार्यालयात घेवून जावून तेथे त्यांची अटक करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मात्र संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक संजय राऊत यांच्या घराबाहेर जमा झाले. त्यामुळे राऊत यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा वाढविण्यात आला. दुपारच्या वेळी काही शिवसैनिक संजय राऊत रहात असलेल्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सीआरपीएफच्या जवानांनी शिवसैनिकांना रोखलं.

संजय राऊत यांना यापूर्वी ईडीकडून दोन ते तीन वेळा चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र संसद अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी काही वेळ ईडीकडे मागितला होता. अखेर संजय राऊत हे हजर होत नसल्याचे पाहुन अखेर आज सकाळी त्यांच्या घरावर धाड टाकली. साडेनऊ तासाच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. आता या चौकशीला सहा तासापेक्षा अधिक काळ झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात मनीलॉर्डिंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *