रामदास आठवले यांची ग्वाही, आंतरजातीय विवाह योजनेतील जाचक अट शिथील करणार

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी यासंदर्भात असणारी हिंदू विवाह कायद्याचीम अट शिथिल करण्यासाठी प्रयन्त करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाने योजना मेळावा आखावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती जनतेला व्हावी म्हणून एक जागर शिबिर संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते.

सामाजिक न्याय मंत्रालयाकडून समाजात जातीभेदाचे दरी दूर व्हावी म्हणून सामाजिक एकात्मता अंतर्गत आंतरजातीय विवाह अनुदान योजना राबविली जात आहे.या योजनेमुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याना सरकारकडून प्रोत्साहनपार लाभ दिले जातात मात्र, या योजनेत असलेल्या प्रमुख अटी मध्ये हिंदू विवाह कायद्यानेच जोडप्याने लग्न केले असल्याची जाचक अट आहे. त्यामुळे बौद्ध पद्धतीत लग्न केलेल्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. बाबासाहेबांच्या विचाराने बौद्ध समाजातील लाखो तरुणांनी आंतरजातीय विवाह करून समाजात एकप्रकारे धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.अशा बौद्ध जोडप्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा म्हणून या योजनेतील ही अट सैल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या केंद्रीय योजने अंतर्गत ४४१ विद्यार्थी वस्तीगृहे सुरू आहेत. त्याचा फायदा ही विभागिय स्तरावर जवळपास हजारो विद्यार्थी घेत आहेत.परदेशातील ऑक्सफर्ड सारख्या नामांकित विद्यापीठांमध्ये विद्यार्थी जात आहेत.२ करोड ४२ लाख दिव्यांग आहेत. त्यांनाही केंद्रीय योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे अशा योजनांची लोकांना माहिती मिळावी म्हणून यापुढे नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा विभागागीय जिल्हात योजना मेळावे आखावे अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आठवले यांनी स्वतःही काही योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

About Editor

Check Also

शुभमन गिल

भारत-दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतून शुभमन गिल बाहेर, ऋषभ पंत कर्णधार

भारताचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *