पोलिस म्हणतात भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मोर्चा नको, तर आंदोलन करा पोलिसांनी परवानगी नाकारल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलितांवर काही समाजकंटकांनी हल्ल्या केल्याच्या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित समाजाच्या विविध संघटनांकडून एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारत मोर्चा नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी असल्याचे सांगितल्याची माहिती एल्गार मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी देत मोर्चा भायखळा येथून निघण्याऐवजी सर्व कार्यकर्त्ये आझाद मैदानावरच थेट जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी २६ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या एल्गार मोर्चाची माहिती देण्यासाठी दादर येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असून हा मोर्चा काढल्यास विद्यार्थ्यांच्या परिक्षेसाठीच्या जाण्या-येण्यावर परिणाम होण्याची असल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी असल्याचेही पोलिसांनी सांगितल्याने मोर्चा काढण्याऐवजी थेट आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र मोर्चाला परवानगी मिळो अथवा न मिळो मोर्चा काढणारच असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी भायखळा ते आझाद मैदान मोर्चा होणार आहे.

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *