आदित्य ठाकरे यांचा विश्वास, मविआचे सरकार राज्यात नाही तर देशात…

बुलढण्यातील प्रचार सभेतून यवतमाळ वशिंची जागा आपण जिंकणार असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात नाही तर देशात सरकार येईल, असे चित्र आहे .. भाजपाच सरकार जे डोक्यावर बसवले ते आता जनतेला नकोय .. दहा वर्ष सत्तेत असूनही विचारता की काँग्रेसने काय केले ? भाजपा केंद्रात बसून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करते .. असं म्हणत सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गारपीट खाली तेव्हा भाजपा मदतीला आलीय ? .. बांधावर कधी आलीय का ? पण इथे मंचावर बसलेल्यांची विचारधारा एकच आहे .. मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना मदत केली, कर्जमाफी केलीय . पण आताचं सरकार शेतकरी विरोधी आहे , असं म्हणत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर आदित्य ठाकरेंनी टीका केली..

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या सरकारच्या काळात एकही उद्योग आला नाही .. सगळे उद्योग गुजरातला गेले.. इकडच्या लोकांनी गुजरातला जायचं का ? केंद्र सरकारला गुजरात बद्दल एव्हढे प्रेम का ? मात्र महाराष्ट्र ने काय केले ? असं म्हणत सरकारने महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा समाचार ही घेतला.

दरम्यान बुलढण्यात प्रचार सभेत उपस्थित शेतकरी बांधवांनी, भगिनींनी भाजप सरकारविरोधात मनात खदखदत असलेला संताप व्यक्त केला . हा संताप फक्त बुलढाण्यातच नाही तर प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *