सोलापूरातून प्रणिती शिंदे, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर भाजपाचे राम सातपुते आणि रणजीतसिंग निंबाळकर पिछाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागील २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूकीपासून भाजपाच्या ताब्यात गेला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील राजकीय घराण्यानेही भाजपाचा हात धरला होता. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे गेले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र माढ्यात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेचून घेणार असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूरात

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ६० हजार ५८९ मते आतापर्यंत मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे राम सातपुते यांना ३७ हजार ५८६ मते मिळाल्याचे दिसून येत आहेत. या दोघांची मते पाहिली तर २३००३ मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

तर माढा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना ४५ हजार ६३९ मते आतापर्यंत मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रणजितसिंग निंबाळकर यांना ३७ हजार ९४५ मते मिळाली आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना ७ हजार ६९४ मतांची आघाडी असल्याचे दिसून येत आहे.
या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यातून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा एकदा खेचून घेणार असल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *