ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांचे निधन पुण्यातील खासगी रूग्णालयात वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्ये, समाजवादी विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ वर्षी पुण्याच्या खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ उर्मिला, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

डॉ कुमार सप्तर्षी यांना मधूमेहाचा त्रास होता. तसेच वयोमानामुळे त्यामुळे ते मागील काही वर्षापासून सामाजिक चळवळीपासून काहीसे दूर राहिले होते. तसेच त्यांची सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीही कमी झाली होती. मात्र आज शनिवारी डॉ कुमार सप्तर्षी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावर सोमवारी २० जुलै रोजी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कोथरुड येथील गांधी भवन येथे सकाळी १० ते १२ वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

ऐन तारूण्यात असताना समाज परिवर्तनाची चळवळ उभारणारे डॉ कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला. युवकांना संघटीत करून सामाजिक आणि राजकिय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी युवक क्रांती दल अर्थात युक्रांद संघटनेची स्थापना केली.

युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरूणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्य आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. डॉ कुमार सप्तर्षी हे फक्त समाजवादी कार्यकर्त्ये नव्हे तर अभ्यासू विचारवंत, वक्ते आणि लेखक म्हणूनही ते ओळखले जात होते. त्यांच्यावर महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्यासह समाजवादी विचारधारेचा प्रभाव होता.

डॉ कुमार सप्तर्षी यांनी त्याकाळी त्यावेळच्या शंकराचार्याशी जाहिरपणे हिंदू धर्मातील अंधश्रध्दा आणि धार्मिक मुल्यांवरून वाद घातला होता. त्यावेळी या दोघांमधील वाद चांगलाच गाजला होता. डॉ कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार आणखी चाळीस तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, परीक्षा शुल्क सरसकट माफ होणार, पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धतेबाबत नियोजन; शेतकऱ्यांकडून वसूली नको - बँकांना निर्देश

राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *