उद्योजक मार्गदर्शक रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्योग आणि राजकारण्यांची रिघ एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले रतन टाटा यांचे पार्थिव

बुधवारी (९ ऑक्टोबर २०२४) रात्री उशिरा रतन टाटा यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस ८६ होते. टाटा यांना सोमवारी (७ ऑक्टोबर, २०२४) दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वय-संबंधित समस्यांमुळे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री रतन टाटा यांचे निधन झाले.

उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री दिर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे संबध देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले. त्यामुळे रात्रीच समाजमाध्यमांवर रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना उद्योग जगातासह, राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी आदरांजली वाहत उद्योगपती रतन टाटा यांना आदरांजली वाहिली. आज सकाळी रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी (१० ऑक्टोबर, २०२४) सकाळी त्यांच्या घरातून पांढऱ्या फुलांनी सजवलेले, दक्षिण मुंबईतील एनसीपीए NCPA येथे ठेवण्यात आले. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी अंत्यदर्शनासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांसह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राजकारण्यांनी रतन टाटा यांना आंदरांजली वाहण्यासाठी पोहोचले.

संध्याकाळी चार वाजता रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूती त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवाला आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच जावई सदानंद सुळे हे एनसीपीए येथे पोहोचले. त्यांच्या काही मिनिटे अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल हे ही रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. याशिवाय शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, मनसे प्रमुख राज ठाकरे या बड्यानेत्यांच्या पाठोपाठ, दुपारी ३ च्या आसपास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंहे हे ही अंत्यदर्शनासाठी आले. तर उद्योग जगतातील आनंद महिंद्रा, मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी आदींनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.

टाटांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना “दूरदर्शी व्यावसायिक नेता, दयाळू आत्मा आणि एक विलक्षण माणूस” असे संबोधले.

एका निवेदनात, काँग्रेसने म्हटले आहे की “पद्मविभूषण रतन टाटा, भारतीय उद्योगाचे टायटन आणि भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपला आकार देणारे एक परोपकारी व्यक्ती यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे.”

एलआयसी LIC ऑफ इंडियाचे सीईओ CEO आणि एमडी MD सिद्धार्थ मोहंती यांनी रतन टाटा यांचे “कुटुंब, मित्र आणि ज्यांच्या जीवनाला त्यांनी स्पर्श केला अशा असंख्य व्यक्तींबद्दल” आठवण करत म्हणाले, “रतन एन टाटा, भारतीय उद्योगाचे प्रतिक आणि परोपकारी आणि दूरदृष्टीचे जागतिक व्यक्तिमत्व, टाटांचा वारसा कायम ठेवण्यासाठी आणि नैतिक व्यवसाय पद्धती, नवोपक्रम आणि परोपकाराच्या शक्तीस्थानात त्याचे रूपांतर करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्याच्या हानीमुळे अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही पण त्यांचा आत्मा जगाला प्रेरणा देत राहील.”

एका युगाचा अंत-शापूरजी मिस्त्री

“मिस्त्री कुटुंबाचे टाटा समूह आणि श्री रतन टाटा यांच्याशी दीर्घकाळचे संबंध आहेत,” एसपी ग्रुपचे अध्यक्ष शापूरजी मिस्त्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “ टाटांच्या दुर्दैवी निधनाने एका युगाचा अंत झाला. टाटा समूहाच्या उत्क्रांतीवर अमिट छाप सोडणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. आम्ही त्यांचे कुटुंब, प्रियजन आणि संपूर्ण टाटा बंधुभगिनींना मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

रतन टाटा कामगार संघटनांचा आदर करत- सरचिटणीस अजित पायगुडे

उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा यांना आदरांजली वाहताना टाटा मोटर्स युनियनचे सरचिटणीस अजित पायगुडे म्हणाले की, त्यांच्यासारखा कोणीही असू शकत नाही. रतन टाटा यांनी प्लांटला दिलेल्या भेटींची आठवण करून देताना पायगुडे म्हणाले की, ते कामगार संघटनांचा आदर करतात आणि प्रत्येक वेळी त्यांच्याशी भेटू असे सांगत.

सिंगापूर एअरलाइन्स बोर्डाकडून रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

“ टाटा हे एक दूरदर्शी जागतिक व्यावसायिक नेते होते, तसेच एक प्रेमळ भागीदार आणि प्रिय मित्र होते. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील मजबूत आणि चिरस्थायी नातेसंबंधाची पायाभरणी करून दशकभरापूर्वी आमचा विस्तारा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विस्ताराने त्वरीत स्वतःला भारतातील सर्वात प्रिय पूर्ण-सेवा एअरलाइन म्हणून स्थापित केले. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

“माझ्या भारतातील अनेक भेटींमध्ये रतन टाटा यांना वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा विशेषाधिकार मला मिळाला. त्यांच्या शहाणपणाने, सचोटीने, प्रेमळपणाने आणि करुणाने माझ्यावर आणि ज्यांना त्यांना भेटण्याचा मान मिळाला त्या सर्वांवर अमिट छाप सोडली,” तो पुढे म्हणाला.

टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणासाठी सहकार्य करत आहेत, “टाटांच्या वारसा आणि दूरदृष्टीने प्रेरित”. “त्याची दृष्टी आणि मूल्ये निःसंशयपणे आमच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन करत राहतील,” तो म्हणाला.
सीईओ यांनी या आव्हानात्मक काळात टाटा कुटुंब आणि संपूर्ण टाटा समूहासोबत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

About Editor

Check Also

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पलटवार, राहुल गांधी यांचे आरोप निराधार अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे, निराधार आरोप करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *