अखेर बाबा सिद्धीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान मध्ये अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणावर गर्दी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकींवर आज रात्री मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी आणि मानणाऱ्या वर्गाने मोठ्या वर्गाने मरिन लाईन्स येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यातच आज पुन्हा मुंबईत परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पावसातही गर्दी कमी झाली नाही.

यावेळी बाबा सिद्धीकी यांना तिरंगा झेंड्यात पोलिस दलाकडून शेवटची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मुस्लिम धार्मिक पद्धतीने प्रार्थना करून त्यांचे पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. यावेळी त्यांचे पुत्र झिशान सिद्धीकी यांच्यासह त्यांचे कुंटुबियही यावेळी उपस्थित होते. हल्लेखोरांनी अचानक बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला करत गोळीबार केला होता. बाबा सिद्धीकी यांच्यावरील अंत्यविधीच्या वेळीही हल्लेखोरांकडून असा हल्ला पुन्हा केला जाण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय म्हणून बडा कब्रस्थान येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता.

पोलिसांकडूनही संपूर्ण बडा कब्रस्थान स्मशानभूमी भोवती सुरक्षा कडे उभारले होते. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लोकांवर नजर ठेवण्यात येत होती. बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शववाहिकेतून बडा कब्रस्थान येथे आणण्यात आले. त्यामुळे त्यांना माननाऱ्या वर्गाकडून मोठ्या जमा झालेल्या नागरिकांच्या मधून वाट काढताना अॅम्युलन्सलाही मार्गक्रमण करण्यात अडचणी येत होत्या. कशी तरी अॅम्ब्युलन्स बडा कब्रास्थानच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शासकिय इतमामात आत अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अंतिम विधी करण्यात आला. तसेच पोलिसांकडून शेवटची मानवंदनाही यावेळी देण्यात आली.

यावेळी बाबा सिद्धीकी यांचा शोकाकूल परिवाला दुःख अनावर झाल्याचे पाह्यला मिळत होते. बाबा सिद्धीकी यांच्यावर दफनविधी करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिव लपटलेला तिरंगा झेंडा काढून त्यांचे सुपुत्र झिशान सिद्धीकी यांच्या हाती पोलिसांनी सन्मानपूर्वक सुपुर्द केला. झिशान सिद्धीकी यांना त्यांचे वडील बाबा सिद्धीकी यांच्या पार्थिवाकडे पाहून आपल्या भावना अनावर होत होत्या. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा खासदार वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *