शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचा आरोप, राजकिय सोयीनुसार मोहन भागवतांचे वक्तव्य मोहन भागवत यांच्या त्या वक्तव्यावर शंकराचार्यांची टीका

काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मातील शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर त्यांच्याच एका विधानावरून टिका केली असून सत्ता मिळाल्यावर मंदिर शोधू नका असे सांगत राजकिय सोयीनुसार ते वक्तव्य करत असल्याची टीका केली.
यावेळी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वर म्हणाले की, सत्ता हवी होती तेव्हा सारखे मंदिर-मंदिर असा जप लावला होता आणि आता सत्ता मिळाल्यानंतर मंदिर शोधू नका असे सांगत राजकिय सोयीनुसार विधान करत असल्याची खोचक टीका केली.

पुढे बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वर म्हणाले की, भूतकाळात परकिय आक्रमकांनी उद्धवस्त केलेल्या मंदिराची यादी तयार करावी आणि वास्तूंचे सर्वेक्षण केलं जावं. यापूर्वी हिंदूवर अनेक अत्याचार झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळे उद्धवस्त झाली आहेत. आता हिंदूंना मंदिराचा जीर्णोध्दार करायचा असेल तर त्यात गैर काय असा सवालही यावेळी उपस्थित केला.

शंकराचार्य विमुक्तेश्वर यांनी मोहन भागवत यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगत मोहन भागवत यांनी राजकिय सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोपही यावेळी केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वर म्हणाले की, जेल्हा त्यांना सत्ता हवी होती तेव्हा मंदिर मंदिर करत होते. आता सत्ता आल्यानंतर मंदिर शोधू नका असा सल्ला ते देत असल्याचेही यावेळी सांगितले.

दरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मस्जिदी खाली मंदिराचा दावा करून कसं चालेल असा सवाल करत कोणत्याही प्रार्थनास्थळाखाली हिंदूची मंदिरे असण्याचा दावा करणे योग्य नसल्याचे वक्तव्य केले होते.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची इंधन तुटवड्यावरून केंद्र सरकारवर टीका पेट्रोलियम क्षेत्रात एस्मा ESMA लागू

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात केंद्र सरकारने एस्मा ESMA लागू केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *