सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची २२ डिसेंबर २०२४ रोजी बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी अधिवक्ता प्रविण शेषराव पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे.
तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी न्यायिक अधिकारी आशिष नाथानी यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात प्रविण शेषराव पाटील तर उत्तराखंडच्या उच्च न्यायालयात आशिष नैथानी हे न्यायाधीश पदी विराजमान झाल्याचे पाहायला मिळेल.
न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अधिकारावरून मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियममध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच केंद्र सरकारने कॉलेजियम कडून करण्यात येणाऱ्या न्यायाधिकाशांच्या नियुक्त्यांना मंजूरी दिली जात नव्हती. तर केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्तीला सहकार्य न करण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडून केली जात नव्हती. अखेर केंद्र सरकारने या प्रकरणी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करत यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली.
मात्र कालातंराच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे अधिकार मान्य करत न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्य करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे देशभरातील विविध उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या कॉलेजियम मार्फत करण्यात येतात. त्याच अधिकारातून सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयात प्रविण शेषराव पाटील तर उत्तराखंड उच्च न्यायालयात आशिष नैथानी यांची नियुक्त केली.
कॉलेजियमकडून जारी करण्यात आलेल्या नावाच्या शिफारसींचे आदेश खालीलप्रमाणे


Marathi e-Batmya