महाराष्ट्र बदलाची सुरुवात मंत्रालयापासूनः चार दिवसानंतर मंत्रालयात आले पाणी महायुती सरकारला मोठा जनाधार सरकारच्या विरोधात बोलू तर भलतीच कारवाई होईल म्हणून अधिकारी चिडीचूप

राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार, विकासाच्या वाटेवर चालणार म्हणून भला मोठा बँनर शपथविधीच्या ठिकाणी लावला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र आता बदल्याशिवाय राहणार नाही, विकासाच्या वाटेवर चालल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणाही दिली. या महाराष्ट्राच्या बदलाची सुरुवात वास्तविक पाहता मंत्रालयापासून सुरु होईल याची यत्किंचितही कोणाला आली नाही. पण त्याची प्रचिती मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मागील चार दिवसापासून येत आहे.

मागील चार दिवसांपासून मंत्रायलाच्या मुख्य इमारती आणि अऍनेक्स इमारतीलामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे त्या परंतु ठिक आहे, असेल काही अडचण पण पाणी येईल म्हणून अऍनेक्स इमारतीतील अनेक कर्मचाऱ्यांना वाटत होते. त्यातच अऍनेक्स इमारतीतील आणि मुख्य इमारतीतील अनेक स्वच्छता गृहाचे काम सुरु असल्याने कदाचित पाण्याची काही अडचण असेल असा समज काहीजणांचा झाला. पण सकाळ दुपार आणि संध्याकाळी असा पाणी काही येईना म्हणून अनेक अधिकारी-महिला कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील स्वच्छता गृहांचा वापर करणेच सोडून दिल्याचे एका महिला अधिकाऱ्याने सांगितले.

त्यातच काल दुपारपासून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत आणि अऍनेक्स इमारतीतील साधा पाण्याचा थेंब कुणाला दिसला नाही. त्यातच मंत्रालयातील अनेक कर्मचारी-अधिकारी अर्थसंकल्पिय अधिवेशनामुळे विधान भवनात जात आणि तेथील स्वच्छता गृहांचा वापर करून येऊ लागले. पण अधिवेशानाचा कालावधी सुरु असल्याने त्याबाबत कोणी स्पष्ट बोलले नाही. पण काल दुपारनंतर मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी पाण्यामुळे मंत्रालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

एकाबाजूला महाराष्ट्र बदलणार आणि विकासाच्या गप्पा गोष्टी करायच्या आणि मंत्रालयातील पाणी पुरवठा ठप्प ठेवायचा हा कोणता विकास असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर काल दुपारी अचानक पणे मंत्रालयातील वीजही दिड तासाहून अधिक काळ गायब झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच विकासाचा हा बोजवारा उडाल्याचे दिसून आल्याने राज्यातील विकासाचे प्रारूप काय असणार असा सवाल मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसह कर्मचारी-अधिकाऱ्यांना कडून उपस्थित करण्यात येत असून आज सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पिण्याचे तर सोडाच (हात) धुवायलाही पाणी कोठेच उपलब्ध नव्हते.

यासंदर्भात पीडब्लूडीतील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मागील चार दिवसांपासून मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत पाणीच येत नाही. तसेच जरी ते आले तरी कमी प्रेशरने येत होते. आजही मुंबई महापालिकेकडून पाणीच आले नाही. त्यामुळे मंत्रालयात पाण्याची वाणवा आहे. पण आम्ही चार टॅकर सध्या टाकीत सोडले आहे. तसेच मुंबई महापालिकेला पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात आली असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणेचा निर्णय संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश

शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *