उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर…. चला मराठी शिकू या हा आमचा उपक्रम

रामनवमी दिन हा दिवस ६ एप्रिल आला. त्यातच रामनवमी हा आणि भाजपाचा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याने भाजपाने त्यांचा वर्धापन दिवस साजरा केला. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावत रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा एवढ्याच माझ्या शुभेच्छा आहेत असे सांगितले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, रामनवमी असल्याने भाजपा वर्धापन दिन साजरा करत आहे का असा सवाल करत रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चाला असा सल्ला देत एसंशि शिंदे गटाच्या शिवसेनेबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, एसंशिच्या आरोपावर मला काही बोलायचं नाही. वक्फ विधेयकाच्या विरोधात काँग्रेसला जर न्यायालयात जायचं असेल तर ठीक आहे. आम्ही शिवसेना उबाठा न्यायालयात जाणार नाही असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाला शुभेच्छा देताना मी पुन्हा सांगतोय प्रभू रामप्रमाणे वागा, निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहिण योजनेचे पैसे वाढवून देत आहोत असं सांगितले होते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगितले होते. प्राण जाये पर वचन न जाऐ हे सांगण्याची गरज आहे. भाजपाने लोकांना फसवून मतं घेतली आहेत. रामाचे नाव घेण्याची या लोकांची पात्रता नाही असे मला वाटते असे सांगत माणिकराव कोकाटे यांच्यावर फसवणूकीचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना आश्चर्यकारकरित्या सोडल्याचेही यावेळी सांगितले.

मनसेने मराठी भाषेच्या मुद्यावरून सुरु केलेल्या आंदोलनावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चला मराठी शिकू या असा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. ज्यांना रहायचं आहे त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. उत्तर भारतीयांना हा मराठी शिकण्यासाठीचा हा उपक्रम असल्याचे सांगत राज ठाकरे यांच्यावर बोलण्याचे टाळले. भाजपाला फक्त जमीन, मालमत्ता आणि व्यापार करणं भाजपाचं काम आहे. वक्फची जमिन घ्यायची, मित्राना द्यायची जैन समाजाची जमिन घ्यायची मित्रांना द्यायची ख्रिश्चनांची जमिन घ्यायची ती मित्रांना द्यायची हेच त्यांच धोरण असल्याची टीका करत वक्फ बोर्ड आणि हिंदूचा काही संबध नाही यांना कुणाला बोलण्याचा अधिकार नाही ऑर्गनाझरने छुपा अजेंडा बाहेर आणला असल्याचा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चनांच्या जमिनी, जैन बांधव, हिंदू देवस्थान, यांच्या जमिनीच्या मालकीही हे लोक घेतील हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही, याचं प्रेम फक्त मित्रांपुरतं मर्यादीत आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध आहे. तसेच आम्ही आमची भूमिका मांडली आहे. ऑर्गनाझरच्या लेखामुळे सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत असे सांगत लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावण्याचं हेच धोरण त्यांचे असल्याची टीकाही भाजपावर केली.

About Editor

Check Also

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *