शरद पवार यांची स्पष्टोक्ती, गृहमंत्र्यांची भूमिका समंज्यसपणाची समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी मांडली भूमिका

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे वक्तव्य केले. तसेच या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात काही निर्णयही घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट करत सुरक्षेच्या दृष्टीने ज्या कमतरता आहेत त्यावर आज चर्चा नको असे सांगत देश एकत्र ठेवणे महत्वाचे असल्याची भूमिका मांडली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आज देश संकटात असताना कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही. काही लोक धार्मिक विचार देण्याचा विचार करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भारतवासियांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकारणा मतभिन्नता असेल, पण जेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही. आता भूमिका एकच देश एकत्र ठेवणं, त्यानंतर या गोष्टींचा विचार करतो. मागील काही दिवसांपासून आपण पहलगामचा विषय ऐकत आहोत. अतिरेक्यांनी हल्ले केले, निष्पा लोकांचे बळी घेतले. जे काही घडलं ती घटना देशाला धक्का होती. हा कुठल्याही जाती धर्माला धक्का नव्हता, हा भारताला धक्का होता. भारतवासियांवर हल्ला झाला. आता देशवासियांसाठी ही जबाबदारी असते की, राजकारणात मतभिन्नता नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी समजंसपणाची भूमिका घेतली असल्याचे सांगत आमच्याकडून कुठेतरी कमतरता झाली आहे. पण त्या कमतरतेवर आज चर्चा नको अशी भूमिका मांडल्याबद्दल अमित शाह यांच्या भूमिकेचे कौतुकही केले.

शरद पवार यांनी शेवटी बोलताना सांगितले की, ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबियांमध्ये विश्वासाचं वातावरण कसं निर्माण करता येईल हे आता पाहिलं पाहिजे असे यावेळी मत व्यक्त केले.

वाढदिवसाचे सत्कारमुर्ती रावसाहेब पवार यावेळी बोलताना म्हणाले की, शरद पवार हे एक विचार आहेत, ज्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे. ते पाहता ते देशासमोरील मोठं आव्हान आहे. आज विचारहीन राजकारण सुरु आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, संविधान जीवंत ठेवायचं असेल तर समाजादाशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर ब्रिटीश परवडले पण या पुढचा काळ परवडणार नाही असेही यावेळी भूमिका मांडली.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर

एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *