मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश, पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये

राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, ‘आई’ पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे, असे निर्देश दिले.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही दिले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *