भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मंत्रिमंडळ निर्णयामुळे १० हजारांहून अधिक पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर बुधवारी ( दि. १ एप्रिल ) शिक्कामोर्तब करण्यात आले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने भूमि अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. यामुळे विभागातील पदरचना आणि वेतनश्रेणीत मोठे बदल होणार आहेत. विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार एकूण १०,६८३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ९,६३८ नियमित पदे असून १०४५ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यामुळे विभागाच्या कामकाजात गती येणार असून जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होईल.

भूकरमापक पदाचे शैक्षणिक स्वरूप आणि कामाची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता भूकरमापकांना एस-६ ऐवजी एस-८ ही सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.

  • पदोन्नतीसाठी नवीन संवर्गाची निर्मिती या सुधारित

निर्णयानुसार, ‘भूकरमापक’ हा संवर्ग आता ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ, भविष्यात या पदावर थेट भरती होणार नाही. त्याऐवजी ‘परिरक्षण भूमापक’ हे पद नियुक्तीचे प्रथम स्तर असेल. तसेच, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी यासाठी ‘परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी)’ हा नवीन संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे.

  • महत्त्वाचे बदल:
  • प्रथम स्तर : परिरक्षण भूमापक हा आता नियुक्तीचा प्राथमिक स्तर असेल.
  • निवड श्रेणी : अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी परिरक्षण भूमापक ( निवड श्रेणी ) ही नवी पदे निर्माण होणार.
  • पदोन्नतीचा मार्ग : परिरक्षण भूमापक (निवड श्रेणी) या संवर्गातून आता थेट ‘शिरस्तेदार’ संवर्गात पदोन्नती मिळणे शक्य होणार आहे.
  • नियम बदल : नवीन पदभरती आणि पदोन्नतीसाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधान मोदी चांगला कारभार करतायत तर विवेक ओबेरॉय, आर माधवन दुबईत का? मोदींवर चित्रपट काढणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन दुबईचे नागरिक

ज्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर चित्रपट काढला ते अभिनेते विवेक ओबेरॉय आणि दुसरे चित्रपट अभिनेते आर. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *