राजकिय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण ६ आठवड्यात तपासणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी
राजकिय फायद्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. यासंदर्भातच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्यानंतरच चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ६ आठवड्यात याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मंत्रालयातील विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजकिय नेत्यांच्या फोन टँपिंग प्रकरणी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि एसआयडीचे सह आयुक्त अमितेषकुमार यांच्या दोन सदस्यीय समितीकडून ही चौकशी करण्यात येणार आहे. या समितीकडून ६ आठवड्यात आपला अहवाल सादर करावा असे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर इस्त्रायल दौऱ्यावर गेलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *