राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊस दर नियंत्रण समिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री …
Read More »तूर, उडीद डाळींच्या साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन केल्यास आता राज्य सरकार कारवाई करणार किंमती वाढविल्या तर थेट कारवाई करा
तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी राज्यांना दिले. तूर आणि उडीद डाळींचा साठा जाहीर करण्यासंदर्भात आणि राज्य सरकारांकडून साठा मर्यादेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यांचे अन्न आणि नागरी …
Read More »खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत वाढ करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) मंगळवारी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने …
Read More »जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात महापारेषणचा १८ वा वर्धापन दिनी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांची घोषणा
महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन …
Read More »राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी …
Read More »पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची व परिक्षेची ताऱीख पदुम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील विविध ४४६ रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. २७ मे म्हणजे उद्यापासून सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर …
Read More »सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन, अन खात्यात ५० हजारांचे अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या १२ शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या १२ शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे. राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ …
Read More »शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार विभाग पाठपुरावा करणार सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश
मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी …
Read More »आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे
राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी – बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ चे …
Read More »एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
“मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली. ‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सगुणा बाग …
Read More »
Marathi e-Batmya