पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री …
Read More »१३१ दिवसानंतर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण स्थगित उपोषणा थांबविले आहे, आंदोलन नाही असा इशाराही दिला
ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर रविवारी आपले बेमुदत उपोषण संपवले. त्यांनी आपले उपोषण संपवले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून पिकांना किमान आधारभूत किमती (एमएसपी) वर कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या इतर प्रश्नांसाठी …
Read More »माणिकराव कोकाटे यांचा अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशांन काय करता? साखरपुडा, लग्न… शेतकऱ्यांनं कर्जमाफी बाबत विचारणा केल्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांच उत्तर
राज्यातील लाडकी बहिण योजनेतंर्गत १५०० चे २१०० रूपये देणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार या दोन आश्वासने महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात दिली होती. मात्र राज्यात सरकार स्थानापन्न होऊन चार महिने झाले तरी लाडक्या बहिणींचे १५०० चे २१०० रूपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन गोष्टी काही अद्याप सत्यात उतरल्या नाहीत. त्यातच …
Read More »विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल, जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची …
Read More »नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरण कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांची माहिती
राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न …
Read More »गायी-म्हशीच्या दूधाच्या दरात वाढः शनिवारपासून दरवाढ लागू दोन्ही दूधाच्या दरात दोन रूपयांची दरवाढ
मार्च महिना सुरु होऊन १०-१५ दिवस झाले नाही तोच राज्यातील तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे, तसेच उन्हाच्या झळाही बसत आहेत. त्यामुळे अंगाला बसणाऱ्या उन्हाच्या झळापासून शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दही-ताक-आईसक्रिम आदी वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय …
Read More »युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे शेतकऱ्याची शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या बुलढाण्यातील खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून पाणी मिळावेसाठी उभारला होता लढा
बुलढाण्याच्या खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शिवणी अरमाळ भागाला पाणी द्यावे यासाठी लढा उभारणारे कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी सूसाईड नोट लिहिली होती. त्यात शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सूसाईड नोटमध्ये लिहिले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कैलास नागरे …
Read More »कांदा उत्पादक शेतकऱी पुन्हा रस्त्यावर राज्यातील कांद्याचा प्रश्न चिघळला
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न चिघळला आहे. सोमवारी विधानसभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन आमदारांनी कांद्याच्या पिकावरील २०% निर्यात शुल्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि येवला आमदार छगन भुजबळ – जे नाशिक जिल्ह्यातील आहेत, जे राज्यातील कांदा पट्ट्याला व्यापते आणि लासलगाव येथील आशियातील सर्वात मोठी कांदा …
Read More »गतवर्षीच्या तुलनेत ४.३ टक्के जास्त धान खरेदी सराकरकडून आतापर्यंत ६७.९१ दशलक्ष टन धान्य विकत घेतले
२०२४-२५ हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) खरेदी मोहिमेच्या जवळपास पाच महिन्यांत, प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये सरकारची धान खरेदी आतापर्यंत ६७.९१ दशलक्ष टन (एमटी) ओलांडली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत ४.३% जास्त आहे. पुढील काही महिन्यांत, सरकार चालू हंगामात ७३ मेट्रिक टन किंवा ४९.५६ मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्याची शक्यता आहे ज्यामुळे धान्याचा साठा वाढेल. …
Read More »माणिकराव कोकाटे यांची माहिती, उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल योजनेच्या माध्यमातून २२६३ कोटीची राज्यात गुंतवणूक, लाभार्थीना ३८९ कोटी अनुदानाचे वितरण
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात एकूण २२ हजार ०१० प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असून छत्रपती संभाजीनगरमध्ये १८९५ सर्वाधिक प्रकल्प मंजूर आहेत. देशात २२००० टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषि व अन्न प्रक्रिया हा …
Read More »
Marathi e-Batmya