Editor

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, रोडमॅप सादर करा…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचा इशाराः मुंबई बँकेत खाते नाही म्हणून शिक्षकांचे पगार थांबवू नका

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण …

Read More »

शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे “या” तारखेला मिळणार

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित मान्यता

विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ कोटी ३९९ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकलपांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागावाटपाबाबत मविआची लवकरच बैठक

तीन राज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत, असं अजिबात होत नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे. …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, …मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार… अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पक्षातील पदाधिकार्‍यांचा पक्षप्रवेश...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा आरक्षण दिले गेले, मात्र ते दोन्ही न्यायालयांनी रद्दबातल केले अशावेळी कायद्याच्या कसोटीवर आरक्षण देत असताना आणि …

Read More »

नव्या वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाकडेः मध्यावधी निवडणूकांचे स्पष्ट संकेत

२०१४ मध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च आणि एप्रिल महिन्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्याची तयारी सुरु केली. तसेच काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असा चंग भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांधला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… दडपशाही धोरणामुळे लोकशाही धोक्यात

देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही …

Read More »

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »