Editor

अतुल लोंढे यांचा सवाल, केदार यांची आमदारकी रद्द करण्याची एवढी घाई का ?

भारतीय जनता पक्षाचे आमदार-खासदार यांना अपात्र करण्याची वेळ येते तेव्हा सर्व कायद्यांच्या पळवाटा व सत्तेचा दुरुपयोग करुन त्यांना वाचवले जाते. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही पण सत्ताधारी भाजपाच्या आमदार, खासदारांना वेगळा न्याय दिला जातो व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय, अशी पद्धत सध्या रुढ झालेली दिसत आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आवाहान मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढा

आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले. मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन उपचार केंद्र

विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. …

Read More »

कुस्तीपटूंच्या लढ्याला यश, क्रिडा मंत्रालयाकडून संजय सिंग यांची निवड बरखास्त

देशाच्या अभिमान आणि गर्वांत भर घालणाऱ्या हरियाणाच्या कुस्ती पटू साक्षी मलिक, विनेश फोगाट. बजरंग पुनिया आणि विरेंद्र सिंह यांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत पुरस्कार वापसीचे आंदोलन सुरु केले. तसेच अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण सिंह आणि विद्यमान अध्यक्ष संजय सिंह यांच्या निवडीवरून सत्ताधारी भाजपा काहीच केले नाही …

Read More »

आणखी एका भारतीय तेलवाहू जहाजावर लाल समुद्रात ड्रोन हल्ला

नुकतेच इस्त्रायलशी संबधित जहाज असल्याच्या संशयावरून एका भारतीय मालवाहू जहाजावर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या माध्यामातून हल्ला केला. त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच गॅबन देशाचा झेंडा लावलेल्या भारतीय तेलवाहू टॅकर असलेल्या जहाजावर आज पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी रेड सी अर्थात लाल समुद्रात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आल्याची माहिती अमेरिकन नौदळाच्या …

Read More »

महाराष्ट्राच्या या खेळाडूंना राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार जाहिर

वर्ष २०२३ साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ९ जानेवारी २०२४ रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल. दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटीशन स्विकारली असून या याचिकेवर २४ जानेवारी न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने भक्कमपणे बाजू मांडू आणि न्यायालयात सांगू की मराठा समाज हा कसा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे ते अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षणासंदर्भात …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, भाजपा हा महिला विरोधी पक्ष

महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आज अनेक प्रश्नांवर चर्चा करण्याकरिता बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी शरद पवार गटाच्या खासदार तथा कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना …

Read More »

इस्त्रायलचे जहाज समजून भारतीय मर्चंट शिपवर ड्रोन हल्ला

समुद्रीमार्गे इस्त्रायला वस्तूंचा पुरवठा करण्यात येत असल्याच्या संशयातून दुबईहून भारताकडे येणाऱ्या मर्चट शिपवर अज्ञात हल्लेखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र शिपवर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नसल्याची माहिती ब्रिटीश …

Read More »