कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, …प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा…
जवळपास मागील आठवड्यापासून संसद सुरक्षा प्रश्नी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या खासदारांकडून संसदेत सातत्याने चर्चेची मागणी करण्यात येत आहे. मात्र मागील तीन दिवसात राज्यसभा आणि लोकसभेतील मिळून १४१ खासदारांना प्रश्न विचारला म्हणून निलंबित करण्यात आले. त्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर …
Read More »नाना पटोले यांची मागणी,… अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या
नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते. सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव आला आहे. विदर्भावर अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, …
Read More »आज पुन्हा संसदेत इंडिया आघाडीचे ४९ खासदार निलंबित, एकूण संख्या १४१ संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह फिरकलेच नाहीत
संसदेत १३ डिसेंबर रोजी सुरक्षा यंत्रणा भेदत देशभरातील सहा राज्यातील सहा तरूणांनी देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर संसदेत आंदोलन केले. या प्रश्नी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे या मागणी संसदेत करत आहेत. मात्र मागणी केली म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांवर …
Read More »महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी
कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, समृद्धीलगत १३ कृषी अणूऊर्जा आधारीत कांद्याची महाबँक
राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,…शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति …
Read More »अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …
Read More »मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर
राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »संसद सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी करणारे विरोधी पक्षाचे ७८ खासदार निलंबित
१३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकूण सहा तरूणांपैकी दोन तरूणांनी लोकसभेत उड्या टाकत धूर फवारणी केली. तर बाकीच्या चार जणांनी संसदेच्या आवारात घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दोन दिवस आधी याप्रश्नी चर्चेची मागणी करणाऱ्या राज्यसभा आणि लोकसभेतील १५ विरोधी …
Read More »
Marathi e-Batmya