राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सर्व समस्या, मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्व रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री भुसे यांनी सांगितले की, रिक्षा चालक बांधवांसाठी राज्य शासनाने यंदाच्या …
Read More »गिरीष महाजन म्हणाले, कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करणे शक्य नाही निवासी वैद्यकीय अधिकारी कंत्राटावरच राहणार
मुंबई व महाराष्ट्रात १०६ निवासी वैद्यकीय अधिकारी अजूनही कंत्राटावर असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातील अनेक अधिकारी हे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत. १६ वर्षे सेवा होऊनही या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २०१० मध्ये पुन्हा मुलाखती घेतल्या गेल्या. मात्र अद्याप त्यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची …
Read More »नाना पटोलेंची टीका, वस्त्रोद्योग कार्यालय हलवण्यामागे महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव पंतप्रधान मोदी जनतेसाठी नाही तर ‘मेहुलभाई’सारख्या मित्रोंसाठीच काम करतात
मुंबई व महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला असून मुंबई व राज्याचे महत्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद …
Read More »बाळासाहेब थोरात यांची मागणी, साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा त्यांच्या वेतनाचा लाभही द्या
अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे …
Read More »धनंजय मुंडे यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, प्रलंबित प्रस्ताव तातडीने काढणार हरभरा खरेदी केंद्र सुरू करा नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील
एकीकडे पाऊस व गारपिठीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपीठ व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रावर विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेडद्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेडकडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच …
Read More »‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात भाजपा आमदार नितेश राणे यांचे आवाहन
राज्यातील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही आ. राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »गायकवाडांनी हिंडेनबर्गचा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटी-शर्थींच्या पूर्ततेशिवाय सहमती नाही कोणत्याही परिस्थितीत धारावीचा पुनर्विकास होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
धारावीतील पुनर्विकास प्रकल्प अदानीला बहाल करण्यात आली असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संशोधन समितीचा अहवाल बाहेर आला. या अहवाालावरून सध्या संसदेत आणि उद्योग जगतात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. या सर्व चर्चेचा संदर्भ देत धारावीच्या काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यावर …
Read More »विषय कामगारांच्या लग्न तुटण्याचा पण देवेंद्र फडणवीसांनी जोडला आदित्य ठाकरेंच्या लग्नाशी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना हजरजबाबी उत्तर
राज्याचे अधिवेशन सुरु होऊन शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून एकमेकांना चिमटे आणि टोप्या उडविण्याचे प्रकार तसे कमीच पाह्यला मिळाले. परंतु दर अधिवेशनात विरोधी बाकावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी बाकावरील भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांच्या टोप्या उडविण्यात येतात. परंतु आज चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …
Read More »ट्विट राऊतांचे पण नाव घेतले शरद पवारांचे यावरून मंत्री भुसे आणि अजित पवारांमध्ये रंगली खडाजंगी राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत आंदोलन...
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मंत्री शासकिय कागदपत्रे सभागृहात सादर केल्यानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा उल्लेख करत ४८ अन्वये निवेदन करण्यास सुरवात केली. पण संजय राऊत यांच्या आरोपांना आव्हान देण्याच्या नादात मंत्री दादाजी भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांचे नाव घेतल्याने …
Read More »गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व …
Read More »
Marathi e-Batmya