नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कोल्हापूरात झालेल्या जाहिर सभेत बोलताना आगामी निवडणूकीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, राहुल गांधी यांची काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित, समाजवादी पार्टी आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे सर्वजण भाजपाच्या विरोधात एकत्रित येतील तरीही आपल्याला लोकसभेच्या ४८ च्या …
Read More »महावितरणचे आवाहन, वाढीव पेन्शन योजनेसाठी निवृत कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करा २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महावितरणमधील जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना – १९९५ या योजनेचे सदस्य आहेत. तसेच या योजने अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी आपला अर्ज संबंधित कार्यालयांमध्ये जमा करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेले संयुक्त पर्यायी …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, आमच्याकडे रद्दी वाढली म्हणून ती कागदपत्रे आयोगाला… निवडणूक आयोगाच्या एककल्ली कारभारावरून साधला निशाणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी न करताच शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहिर केले. आज सोमवारी २० फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात आयोजित …
Read More »मागासवर्गीय विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी आयआयटीच्या संचालकाची हकालपट्टी करा सीबीआय चौकशीची भीम आर्मीची मागणी
पवई येथील आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याने आत्महत्या केली असून आत्महत्ये प्रकरणी आयआयटीच्या संचालकांची हकालपट्टी करण्यात यावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भीम आर्मीने आज पवई येथील आयआयटीवर धडक मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. या संस्थेतील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी यासाठी मंत्रालयावर धडक …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, याचा सामना आत्ताच केला नाही तर देशात हुकूमशाहीचा… धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरण्याचा पूर्वनियोजित कट
नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर काल भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना धोकेबाज असल्याची टीका करत भाजपासोबत निवडणूका लढवून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केल्याने आम्ही ठाकरेंना रस्त्यावर …
Read More »ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारः मात्र नियमित याचिकेसोबत यावरही सुनावणी घ्या
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत सर्वचस्तरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज सकाळी याचिका दाखल करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेता येत नसल्याचा निर्णय दिला. …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, म्हणून यांना (उध्दव ठाकरे) रस्त्यावर आणून सोडले एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव मिळवून दिल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत फडणवीसांचे वक्तव्य
असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपच्या विजय संकल्प सभेला रविवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी फडणवीस यांनी उद्धव …
Read More »अमित शाहनी ४८ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत, उध्दव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांच्या चरणी बहुमताने महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार निवडूण द्या
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, …
Read More »उध्दव ठाकरेंचा मोदींना इशारा, केंद्राची भीक नकोय, मुंबई ही कष्टकऱ्यांची यांचा डोळा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर
शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर मुंबईतील विविध विकास कामांच्या शुमारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नसतो असे मोठे विधान केले. या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, यांचा डोळा मुंबई महापालिकेने विकास कामे करून …
Read More »चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक …
Read More »
Marathi e-Batmya