मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी आपला कर्नाटकचा दौरा रद्द केला. त्यातच आज बेळगावातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आला. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …
Read More »लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू; हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू १०० टक्के लसीकरण होऊनही लम्पी रोगाची लागण सुरुच- नाना पटोले
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का …
Read More »कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय
कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे ग्वाही, कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार देणार कोकण महोत्सवात दिले आश्वासन
“कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी …
Read More »सीमावाद चिघळलाः महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात दगडफेक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मईंना केला फोन
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. तसेच उचकाविण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यातच महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगांवात जाणार असल्याचे जाहिर केल्यानंतर या मंत्र्यांनाच अटकाव करणारे आदेश कर्नाटक सरकारने जारी केले. या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्राच्या वाहनांवर बेळगांव जवळील हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर कन्नड रक्षण …
Read More »मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही, इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले नमन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, …
Read More »आंबेडकरांसोबतच्या बैठकीवर उध्दव ठाकरे म्हणाले, होय त्यांचे काही प्रश्न आहेत.. डिसेंबर अखेर वाटाघाटी पूर्ण करून महाआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
आगामी पालिका आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेले नसले. तरी यासंदर्भात उध्दव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी आंबेडकर-ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीला दुजोरा दिला. तसेच आघाडीबाबतची …
Read More »अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात …
Read More »उध्दव ठाकरेंचा इशारा, राज्यपाल आणि नेभळट शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा
मागील काही दिवसांपासून राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या अवमानाच्या आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर एक चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा …
Read More »आशिष शेलार म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा सामनाच्या अग्रलेखाला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे उत्तर
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? …असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सामनातील अग्रलेखाला प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, विरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, …
Read More »
Marathi e-Batmya