Editor

अजित पवार यांचे आदेश, या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखा बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय, राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार ४ ऑक्टोबरला १०,३०९ नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात ५१८७ अनुकंपा उमेदवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५१२२ एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या भाडेवाढ रद्दच्या निर्णयाची प्रताप सरनाईक यांच्याकडून अंमलबजावणी एसटीची १० टक्के भाडेवाड रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलात

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे …

Read More »

आरएसएसची १०० री सांस्कृतिक खात्याकडून साजरीः संघावर टपाल तिकीट आणि १०० नाणे प्रकाशित पंतप्रधान मोदींकडून पुन्हा स्वांतत्र्य लढ्यात संघाचा सहभाग

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला १०० री पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक खात्याने आयोजित करत १०० री साजरी केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास करून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर विशेष टपालाचे प्रकाशन करत १०० रूपयांचे नाणे आणि त्यावर संघाच्या भारतमातेचा लोगोही छापण्यात आला आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' निर्माण करा

नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, तात्कालीन विरोधी पक्षनेत्यांचे पत्र मुख्यंत्र्यांना पाठवू का? ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यावरून साधला निशाणा

राज्यात मराठावाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याचे जाहिर केले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना उबाठाचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मनुस्मृती व बंच ऑफ थॉटचे दहन करून आरएसएस विसर्जित करा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या व दिवाळीच्या आधी कर्जमाफी करा

संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता …

Read More »

आमदार रईस शेख यांची स्पष्टोक्ती, एसआयआरकडे लक्ष देण्यास राजकिय पक्षांना वेळ नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली मागणी, स्थानिक निवडणूकांना समांतर केल्यास अनेकांची नावे कापली जाण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात मतदार याद्या पुर्ननिरिक्षण (Special Intensive Revision – SIR) करण्याचे काम हाती घेतल्यास राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना वेळ असणार नाही. परिणामी, मतदारांची मोठ्या संख्येने नावे कापली जातील, अशी भीती व्यक्त करत निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारीनंतर हा कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख …

Read More »

सप्टेंबर महिन्यात वाहन विक्रीत दुहेरी घट , आता आशा सणासुदीची १.५१ दशलक्ष वाहन विक्री

सप्टेंबरमध्ये एकूण किरकोळ वाहन विक्रीत दुहेरी अंकी घट झाली, परंतु सणासुदीच्या आधी मागणीत उशिरा वाढ झाल्याने उत्पादकांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळाला आणि ऑक्टोबरमध्ये अधिक मजबूत होण्याची आशा निर्माण झाली. वाहनच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत नोंदणी १.५१ दशलक्ष युनिट्सवर होती, जी गेल्या वर्षीच्या १.७४ दशलक्ष युनिट्सपेक्षा १३.२८% कमी आहे. …

Read More »

आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती

भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी दिली. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पूर्व-ईशान्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर देशाच्या इतर भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची …

Read More »