Editor

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने नवी मुंबईत

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादीत करणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आणि फिफा (१७ वर्षा आतील) महिला फुटबॉलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना यश संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना २८ सप्टेंबरपासून सुरुवात

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासह दिवाणी न्यायालयाची स्थापना, राज्य मालमत्ता पुर्नरचना कंपनी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती यासह अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यमंत्री मंत्रिमंडळातील निर्णय खालीलप्रमाणे… भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ …

Read More »

शासनातील क्लार्कची पदे लोकसेवा आयोगामार्फत तर पोलिस भरतीही लवकरच राज्यातील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार

राज्यातील शासन वर्गातील ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त …

Read More »

हिंदू सण बंदीवरून शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांचे राष्ट्रीय धोरण महाराष्ट्राने पाळले फडणवीस आणि भाजपाच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

आज एका वर्तमान पत्रामध्ये पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय पक्षांवर केल्या हे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे वृत्त आले आहे. या कालावधीत समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या निवडणूकीनंतरच्या आहेत. त्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची …

Read More »

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा काढणार

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या माध्यमातून (एसपीव्ही) एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

शरद पवार यांचे प्रत्युत्तर, चौकशी करता येईल तेवढ्या लवकर करा… आरोप वास्तव आणि सत्याला धरुन नसतील तर आरोप करणाऱ्यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्य सरकारने जाहीर करावे

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली. अतुल भातखळकर यांनी केलेल्या या आरोपाच्या अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भातखळकर अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याचे सांगत राज्य सरकार चौकशी करेल असे जाहिर केले. अतुल भातखळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुंबईतल्या प्रकल्पासाठी चेन्नईत का मुलाखती? सात वर्षे एमएसआरडीसीचे मंत्री असलेल्यांनी उत्तर द्यावे

वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. लोकांच्या हिताचं काम करणाऱ्या मविआ सरकारला पाडून आलेल्या या …

Read More »

खळखळून हसविणाऱ्या राजू श्रीवास्तवची भूतलाच्या रंगमंचावरून दु:खद एक्झीट निधनाने सर्वच स्थरातून हळहळ

धकाधकीच्या जीवनामुळे मागील काही वर्षांमध्ये व्यक्तींच्या जीवनातून खळाळून हसणे जवळपास लुप्त होत चालले आहे. मात्र त्यातही काही काळ आपल्या धकाधकीचा ताण- तणाव, दु:ख, चिंता विसरायला लावणारा आणि जीवनातील निखळ विनोदांचा आस्वाद घ्यायला लावत खळाळून हसायला भाग पाडणारे विनोदी कलावंत राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ वर्षी आज सकाळी अखेरचा श्वास घेत …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तर मला अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याने संभ्रम, शिवसेनेत आहे की नाही? जळगांवच्या सभेत बोलताना शिवसेनेत असताना असा शब्द प्रयोग केल्याने संभ्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित वेगळी चूल मांडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांनाही सोबत नेले. बंडाचे निशाण फडकाविल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांकडून शिवसेना आमचीच खरी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आज एकनाथ शिंदे यांनीच जळगांव येथील जाहिर सभेत बोलताना पाणी …

Read More »