विधानसभेत एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री (छगन भुजबळ) यांनी घोटाळा केल्याचे आरोपपत्रात लिहिलेले असतानाही आणि त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याविषयीचा पत्रक काढलेले असतानाही त्या मंत्र्याच्या विरोधात अपील का केले नाही? असा सवाल करत त्या मंत्र्यांच्या विरोधात अपील करणार असे जाहिर …
Read More »मुख्यमंत्री शिंदेच्या इशाऱ्यानंतर आज शिंदे गट- मविआ आमदार भिडले एकमेकांशी रोहित पवार आणि सुरक्षा रक्षकांनाही आवरले नाहीत शिंदे गटाचे आमदार
आतापर्यंत महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात सौजन्य आणि मैत्री सौहार्दाचे असलेले चित्र आज पहिल्यांदाच बिघडल्याचे विधान भवनाच्या आवारात राज्याच्या जनतेला पाह्यला मिळाले. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिठ्या काढण्याचा इशारा देत सहनशीलता संपेल अशी वेळ आणू देऊ नका असे आवाहन विरोधकांना केले. मात्र आज विरोधक महाविकास आघाडीच्या आंदोलनाची जागा सत्ताधारी …
Read More »शरद पवार यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा, एकिकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलयचं अन… बिल्कीस बानो प्रकरणावरून केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली. नवी दिल्लीत आज आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची पत्राद्वारे शेतकऱ्यांना साद, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया… छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया
राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील …
Read More »मंत्रालयाच्या टेरेसवर दोघे जण चढले, आत्महत्या करण्याचा दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नाने तरूण उतरले खाली
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र दुपारी उस्मानाबादच्या शेतकऱ्यांने विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स सिनेमागृहासमोर स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत सदर शेतकऱ्याला वाचविले. ही घटना ताजी असतानाच मंत्रालयाच्या टेरेसवर दोन तरूण चढून आपल्या मागण्याप्रश्नी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याची आणखी एक घटना …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत ‘या’ मागणीवरून विरोधी पक्षाचा सभात्याग… महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्यांकडे सरकारने केले दुर्लक्ष...
शिंदे-फडणवीस सरकारने आज ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता…शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला हवी होती याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र …
Read More »विधान भवन पासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला मात्र १५ टक्के भाजला
विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आयनॉक्स थिएटर समोर उस्मानाबादचे सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, २५ हजार कोटींच्या मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे अत्यंत …
Read More »भाषणात व्यत्यय आणण्यावरून जयंत पाटील आणि विधानसभाध्यक्षामध्ये खडाजंगी आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होतोय
विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर राईट रिप्लाय अंतर्गत अजित पवार हे बोलायला उभे राहीले. मात्र मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना थांबवित त्या घटनेची माहिती देवू लागले. त्यामुळे लोकशाही संकेताचे हे सरळसरळ उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगत जे काही बोलायचे …
Read More »
Marathi e-Batmya