अंधेरीत ३ नोव्हेंबरला आयोगाकडून सार्वजनिक सुट्टी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व ‘ विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन

About Editor

Check Also

इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध जुलै महिन्यात होणाऱ्या परिक्षेसाठी प्रवेश पत्र तयार

इयत्ता १० व इयत्ता १२ वी च्या जुन – जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ८ जून २०२६ पासून उपलब्ध करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *