Editor

रिलायन्स जिओ आणणार ५ हजार कोटींचे बाँड, मिळेल ‘इतका’ व्याजदर आतापर्यतचा सर्वात मोठा बाँड ठरणार

मराठी ई-बातम्या टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ५ हजार कोटी रुपयांचे रोखे (कॉर्पोरेट बाँड) आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बाँड इश्यू असेल. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या या कॉर्पोरेट बाँडची मॅच्युरिटी ५ वर्षे असेल. तर या बाँडवर व्याज दर ६.२ टक्के असेल. कॉर्पोरेट बाँडमधून गोळा केलेले पैसे कंपनी तिच्या आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्यासाठी वापरेल. यापूर्वी २०१८ मध्ये देखील जिओने स्थानिक चलन बाँड आणले होते. रिलायन्स जिओमध्ये २०२० मध्ये अनेक …

Read More »

सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार? मंत्री उदय सामंत यांच्याकडून आज घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून विशेषत: मुंबईसह उपनगरात आणि राज्यात कोरोना व ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय जवळपास झाला असून तशी तयारीही सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूनीही दाखविली आहे. यासंदर्भात आज दिवसभरात उच्च शिक्षण मंत्री उदय …

Read More »

मंत्र्यांनंतर आता त्यांचे डिएलओं आणि कर्मचाऱ्यांना होतेय कोरोनाची लागण तीन ते चार जण सध्या प्रकृती अस्वास्थामुळे घरी

मराठी ई-बातम्या टीम राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही आता हळूहळू कोरोना आणि ओमायक्रॉनचा शिरकाव होताना दिसत आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामकाज आणि निर्णयाला प्रसिध्दी मिळावी यासाठी राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील डिएलओंची नियुक्ती करण्यात येते. राज्य सरकारमधील जवळपास १० मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या डिएलओंनाही लागण होत असल्याचे माहिती पुढे …

Read More »

अॅपलची मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी २२४ लाख कोटींची जगातील सर्वात मोठी कंपनी, मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम वर्ष २०२२ च्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी Apple च्या मार्केट कॅपने इतिहासात प्रथमच ३ ट्रिलियन डॉलरचा (सुमारे २२४ लाख कोटी रुपये) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे हे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. भारताचा जीडीपी २.६५ ट्रिलियन डॉलर आहे. वर्षाच्या  ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी सिलिकॉन …

Read More »

३१ डिसेंबरपर्यंत आयकर रिटर्न भरला नाही? काळजी करू नका, आणखी एक संधी फक्त दंड भरा आणि आयटीआर पुन्हा दाखल करा

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर होती. परंतु असे अनेक लोक आहेत जे आयटीआर दाखल करू शकले नाहीत. तुम्ही अद्याप दाखल केले नसल्यास, तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत विलंब शुल्कासह ITR दाखल करू शकता. विलंब शुल्क किती असेल? आयकर कायद्याच्या कलम 139(1) …

Read More »

अनाथांच्या डोक्यावरची असलेली सिंधूताई नावाची छत्रछाया हरविली वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम आपल्या वैयक्तीक आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांना मायेच्या झऱ्यात परिवर्तित करून हजारो अनाथ मुलांच्या डोक्यावर मायेची छत्रछाया धरणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आयुष्यभर वटवृक्ष बनणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे आज पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी रात्री ८ वाजता निधन झाले. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं …

Read More »

मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने अनेक कोरोनाबाधित नियंत्रणात आल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु ही अटकळ मंगळवारी फोल ठरली असून मुंबई १० हजार ६०६ इतके बाधित आढळून आले असून मुंबईसह उपनगरात एकूण १५ हजार ६६३ इतके बाधित आढळून आले आहेत. …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले “हे” उत्तर निधी वेगळ्या पध्दतीने खर्च करण्याबाबत परवानगी मागतोय

मराठी ई-बातम्या टीम सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतल्यानंतर कोरोनाच्या प्रश्नावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार फारच संथगतीने काम करत असल्याचा आरोप करत दिलेला निधी खर्चही करत नसल्याची टीका केली. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, त्या येणार …

Read More »

केंद्रीय मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, राज्य सरकार धिम्यागतीने काम करतयं, निधी खर्च करत नाही आरोग्य मंत्री टोपे आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख बोलावूनही आले नाहीत

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्रातलं सरकार काम करत नाही असे मी म्हणणार नाही. परंतु जे काही काम करत आहे ते अत्यंत धिम्यागतीने संथगतीने काम करत असल्याचा खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी राज्य सरकारला २० ते २३ हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र तो अद्याप खर्च केला नसल्याचा गंभीर …

Read More »

अजित पवार मास्कबद्दल म्हणाले, त्या डिझाईनवाल्याचा उपयोग नाही सर्जिकल आणि एन-95 मास्कच वापरा

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर घराबाहेर जायचे असेल तर मास्क वापरणे राज्य आणि केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क बाजारात आणले आहेत. मात्र हे मास्क लोकांच्या खरोखरीच उपयोगाचे आहेत का याबाबत नेहमीच चर्चा होत होती. मात्र त्यावर ठामपणे आणि …

Read More »