Editor

पोलिसांना पुन्हा गृहकर्ज, सौर कुंपणासाठी अनुदानासह मंत्रिमंडळाने घेतले “हे” निर्णय पोलिसाबरोबर जिल्हा रूग्णालयात पुरविणार या सुविधा

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी ४० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक …

Read More »

महाविकास आघाडी उभारणार, देशातील पहिलाच प्रकल्प जनुक कोष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

देशातील पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पातील शिफारशीनुसार राज्यभरात अंमलबजावणी केल्यास राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरीता नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने सन …

Read More »

अनुसूचित जातीतील घटकांना पुन्हा मिळणार कर्ज, महामंडळांच्या भागभांडवलात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मागील काही वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संज रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, राज्य दिव्यांग वित्त व विकास वित्त विकास व विकास महामंडळ आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला निधीच देण्यात येत नव्हता. त्यामुळे अनुसूचित जातीतील तरूणांना उद्योग व्यवसायासाठी कर्जच उपलब्ध होवू शकले नाही. …

Read More »

सोमय्यांची मागणी, हल्ल्यांची सीबीआय चौकशी करा किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात याचिका

मागील आठवड्याच्या शेवटी अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात जावून येताना भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून व्हनवुटीजवळ किंचिंत खरचटल्याने थोडेसे रक्त आले. मात्र त्यावर शिवसेना भाजपामध्ये …

Read More »

३० एप्रिल आणि १ मे ला तीन मोठ्या राजकिय घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय गोष्टींना गती

राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकिय घडामोडी होणार आहेत. ३० एप्रिल रोजी पुण्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …

Read More »

भाजपा- राष्ट्रवादी युतीबाबत त्या दोघांचे वक्तव्य संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पलटवार

२०१७ मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होणार होती. तसेच त्यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार आशिष शेलार यांनी करून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेची माहिती उघडकीस आणली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुनगंटीवार आणि शेलार यांनी केलेल्या …

Read More »

भाजपा म्हणते, आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या अज्ञानाचे पुन्हा दर्शन घडविले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची घणाघाती टीका

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटी चा मुद्दा …

Read More »

मोदींच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, जेवढा कर जातो त्या तुलनेत…. पण सर्वात आधी केंद्राचा कर नंतर राज्यांचा कर

पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात असलेल्या व्हॅट टॅक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर आरोप करत राज्यातील महागाई वाढीस महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत थकीत जीएसटीच्या रकमेवरून निशाणा साधला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय वैद्यकीय कारणास्तव सर्जरी करण्यासाठी केला पीएलएमए न्यायालयात जामीन अर्ज

२० वर्षापूर्वी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारात अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या लोकांचे संबध उघड झाल्याने सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळावा यासाठी पीएलएमए न्यायालयात अर्ज केला. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबॅसिस कार्पस याचिका दाखल करत …

Read More »

महाराष्ट्रात “सत्तेचे भोगी” म्हणत राज ठाकरेंनी केले “योगी आदित्यनाथां”चे अभिनंदन भोंगे उतरविल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक

जवळपास २० दिवसांहून अधिक काळ मनसेने राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक पवित्रा घेत भोंगे उतरवा नाही तर मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मात्र त्यानंतर टीका-टीपण्णीला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळावरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी …

Read More »