मुंबई: प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून राज्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजार, कला केंद्रे, यात्रा आदी गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. मात्र शहरी भागात सध्या काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या धर्तीवर या बंद करण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता …
Read More »कोरोनामुळे अखेर उत्सवात दहीहंडी न फोडताच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …
Read More »एकाच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्रातील चिपळूण, सोलापूरात जातीयवादाच्या दोन मोठ्या घटना चिपळूणात मागासवर्गीयांना निवारा लांब करायला लावला, तर माळशिरसमध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीस करण्यास नकार
सोलापूर-रत्नागिरी-मुंबई: प्रतिनिधी फुले, शाहू आणि राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून उल्लेख केला जातो. मात्र याच महाराष्ट्रात एकाच महिन्यात जातीवादाच्या दोन घटना घडल्या असून त्यातील एक चिपळूण तर दुसरी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगांव येथे एका मातंग समाजाच्या व्यक्तीने अॅट्रोसिटी …
Read More »जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्याबरोबर काँग्रेस आणि भाजपाही राहणार दूर
सातारा: प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार …
Read More »काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच केली मंत्री केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फीची मागणी काँग्रेस संसदीय समितीचे सदस्य डॉ.आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर- मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य तीन बँकांना ८०० कोटी रूपयांचा चुना लावला आहे. विशेष म्हणजे स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलच्या अध्यक्षालाच सरकारी वकील म्हणून नियुक्त करून स्वत:चा बचाव करत असून सदरचा सरकारी वकील बदलावा आणि पदुम …
Read More »कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून …
Read More »गृहमंत्री वळसे-पाटील यांची मोठी घोषणा तर आढळराव पाटलांचे त्यांनाच आव्हान भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही आग्रही
पुणे: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात काही प्रमाणात निर्बंध अद्यापही लागू असताना बैलगाडी शर्यतीवरून भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला आव्हान देत या शर्यतीचे आयोजन केले. याप्रकरणी पडकरांसह अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असतानाच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच उपस्थितीत १५ दिवसात गृहमंत्र्यांच्या मतदारसंघ …
Read More »नारायण राणेंची एकाबाजूला मुख्यमंत्र्यांवर टीका तर दुसऱ्याबाजूला आवाहन मी घरातून काम करत नाही आणि डावीकडे उजवीकडे बघून उत्तर देत नाही
मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही. तसेच, मी घरात बसून काम करत नाही आणि व्यासपीठावर डावीकडे, उजवीकडे पाहून उत्तर देत नसल्याची उपरोधिक टीकेची झोड केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर उठवित गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करत बसण्यापेक्षा बेरोजगार झालेल्यांना पुन्हा …
Read More »आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मुलुंड शासकीय आयटीआय आणि आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार
मुंबई : प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फुड …
Read More »राहुल गांधींबद्दल रावसाहेब दानवेंची भाषा कुसंस्कृतपणा दर्शवणारी महागाई, बेरोज़गारी, ग़रीबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते सांगा ? -नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने ७ …
Read More »
Marathi e-Batmya