मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला चांगल्यापैकी यश आल्यानंतर आजपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली खरी मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक मुंबादेवीचे दर्शन घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रभादेवी येथील सिध्दीविनायकाचे दर्शन घेवून पुणे …
Read More »आजपासून मिशन कवच कुंडल अभियान : दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. …
Read More »आमचे नेते घाबरणारे नाही… उलट सरकार अजून भक्कम होतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईः प्रतिनिधी ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय. परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …
Read More »ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ बडोदाने केली व्याजदरात कपात गृहकर्ज ०.२५ टक्क्याने स्वस्त
मुंबईः प्रतिनिधी बँक ऑफ बडोदाने आपलं गृहकर्ज स्वस्त केलं आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आता बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून सुरू होईल. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. नवीन दर ७ ऑक्टोबर २०२१ पासून लागू झाले आहेत आणि ३१ …
Read More »मलिकांचा भंडाफोड आणि अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकरची कारवाई हे तर खालच्या पातळीवरचे राजकारण-प्राप्तिकर विभागाच्या धाडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे-कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी एनसीबीने आर्यन खान, अब्बास मर्चंट यांच्यावर केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचा संबध भाजपाशी असल्याचा आरोप केला. यास काही तासांचा अवधी उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चेला …
Read More »३३ टक्के किंवा त्याहून अधिक शेतीनुकसान झालेल्या बाधितांना मिळणार भरपाई गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीसाठी १२२ कोटी मंजूर
मुंबई : प्रतिनिधी गारपीट व अवेळी पावसामुळे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले. गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने शेतपिकाच्या …
Read More »दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेटः ‘इतक्या’ दिवसांचा मिळणार बोनस ७८ दिवसांचा बोनस मिळणार
नवी दिल्लीः प्रतिनिधी दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या ११.५६ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती …
Read More »लखीमपूर खेरीतील दुर्घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खेदः घेतले हे महत्वाचे निर्णय सार्वजनिक तांदूळ, रूग्णालयाच्या खाटा वाढविणे यासह अनेक निर्णय घेतले
मुंबईः प्रतिनिधी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. …
Read More »एनसीबीचा दावाः आम्हीच क्रुजवर जावून कारवाई केली नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले
मुंबईः प्रतिनिधी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर आर्यन खान, अरबाज मर्चंटवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट करत एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे एनसीबीने तात्काळ पत्रकार परिषद बोलावित ती कारवाई एनसीबीनेच केल्याचा दावा केला. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुजवर …
Read More »काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ !: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक …
Read More »
Marathi e-Batmya