मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत १ हजार ५८४ पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांची …
Read More »सीताराम कुंटे आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार तर मुख्य सचिव पदाची धुरा चक्रवतींकडे अप्पर मुख्य सचिव देबाषीश चक्रवर्ती यांच्याकडे तात्पुरता पदभार
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे आज मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्याने मुख्य सचिव पदाचा पदभार अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपुर्द करण्यात आला. तसेच कोरोना काळात आणि त्यांची प्रदीर्घ प्रशासकिय सेवेतील अनुभव पाहून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रधान सल्लागार पदी राज्य सरकारने …
Read More »राज्यातील महाविद्यालयांमध्ये इन्फोसिस देणार ३ हजार ९०० कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच या कराराच्या माध्यमातून ३ हजार ९०० पेक्षा …
Read More »शाळांची घंटा १ तारखेलाच वाजणारः फक्त या नियमांचे पालन करावे लागणार पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई: प्रतिनिधी येत्या १ डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू …
Read More »आघाडी सरकार विधिमंडळाला घाबरणारे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे टीकास्त्र
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या नावाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करणारे महाविकास आघाडीचे सरकार हे विधिमंडळाला घाबरणारे सरकार आहे, अशी धारदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सोमवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना संकटातून हळूहळू सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. संसदेचे …
Read More »परमबीर सिंग व सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग व सचिन वाझे हे चांदिवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली …
Read More »१ डिसेंबरपासून होणार आहेत ५ मोठे बदल, जाणून घ्या… पाच गोष्टींमध्ये होणार बदल
मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढचा महिना म्हणजे डिसेंबर महिना अनेक बदल घेऊन येणार आहे. १ डिसेंबरपासून बँकिंग आणि ईपीएफओसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच ५ बदलांबद्दल सांगत आहोत. पीएफचे पैसे थांबतील युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ३० …
Read More »अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार विरोधी पक्षांच्या सरकारांशी भेदभाव करत असून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत असते. आरटीआय अंतर्गत मागविलेल्या माहितीनुसार अनुदान सहाय्यतेत मोदी सरकार महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देत असल्याच्या आमच्या संशयाला पुष्टी मिळते आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात …
Read More »साबण, डिटर्जंटच्या किंमती वाढल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेडने वाढविल्या किंमती
मुंबईः प्रतिनिधी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि ITC लिमिटेड यांनी त्यांच्या निवडक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. जास्त उत्पादन खर्चामुळे किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे व्हील डिटर्जेंट पावडरच्या एक किलो पॅकची किंमत आता ३.५ % वाढली आहे. अर्धा किलो आणि एक किलोच्या पॅकवर निवडक …
Read More »विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची अधिकृत तारीख अखेर जाहीर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत-विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक २४ डिसेंबर २०२१ रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात …
Read More »
Marathi e-Batmya