Editor

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, ओळखपत्र म्हणून आधारच तसे आदेश जारी करण्याचे बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदेश

बिहारमध्ये विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या सुधारित मतदार यादीत मतदाराचा समावेश करण्यासाठी आधार ओळखपत्र म्हणून स्वीकारला जाईल, अशी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) दिले. मतदार यादीतून वगळण्याच्या प्रस्तावित ६५ लाख नावांच्या संदर्भात यापूर्वी असेच निर्देश देण्यात आले होते. आता हे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करा केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवावे

राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची माहिती, न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटना तयार मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे नुकसान

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. पण दुसरा शासन निर्णय काढताना मात्र पात्र हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ असा निघतो की मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण मिळू शकते. हे ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. राज्यातील विविध ओबीसी संघटनाच्या बैठकीत आज ही …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरसाठी तीन संस्थामध्ये करार एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हु डको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी

१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हापरिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकामधील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा मंडल आयोग, कालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले

ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या ओबीसी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, एकदा चष्मा लावून बघा, रोहित पवार म्हणाले निनावी का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निनावी जाहिरातीवरून एकमेकांवर सोडले टीकास्त्र

राज्य सरकारमधील भाजपाच्या मित्र पक्षातील मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठमोठ्या जाहिराती निनावी पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षावर टीकास्त्र सोडले. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडण्या कशा गोळा केल्या …

Read More »

निनावी मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहिरातीः रोहित पवार यांचा निशाणा मित्र पक्षातील मंत्र्याने फडणवीस यांच्या नावाने जाहिराती देत खुष करण्याचा प्रयत्न

राज्यात महायुतीचे सरकार स्थान्नापन्न आहे. मात्र या भाजपाचा मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना खुष करण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांमध्ये निनावी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसून येते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधत टीका केली. पुढे बोलताना रोहित …

Read More »

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी घेतली भेट

विधान परिषदेतील शिवसेना उबाठाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आमदाराकीचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत पदा सध्या रिक्त आहे. तर शिवसेना उबाठाच्या संख्याबळानंतर काँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे …

Read More »

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि समाज माध्यमांवरील बंदीच्या विरोधात जनता रस्त्यावर पोलिस गोळीबारात सहा जण ठारः संसदेतही जमाव घुसला

सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच घातलेल्या बंदीविरोधात काठमांडू आणि इतर प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर ताबा मिळवणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याने किमान सहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय ट्रॉमा सेंटरने वृत्त दिले आहे की, उपचारासाठी आणलेल्या जखमींपैकी चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण सिव्हिल …

Read More »