Editor

निकालानंतर भुजबळ म्हणाले, “”साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए….” कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी एसीबी न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आपला निर्णय दिल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची तसेच …

Read More »

भुजबळ आणि त्याचा पुतण्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त एसीबी न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील राज्य सरकारच्या मालकीच्या आरटीओच्या जमिनींवरील बांधकाम आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाचा ठेका देताना मोठ्या प्रमाणावर छगन भुजबळ यांना लाच मिळाल्याच्या आरोपातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर बुजबळ यांची आज एसीबीच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच याप्रकरणात सबळ …

Read More »

देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक: लुटणाऱ्यांविरोधात काँग्रेस करणार संघर्ष केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा!: नाना पटोले

सातारा-मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडावून, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला …

Read More »

कोणतीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये मात्र पंचनाम्यांची शहानिशा करा आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत, कोणताही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना देतानाच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार …

Read More »

गणेशोत्सव काळात मंडपात जावून दर्शनास बंदी सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नावाजलेल्या मंडळाच्या मंडपात प्रत्यक्ष जावून दर्शन घेण्यास राज्य सरकारने सर्वच नागरीकांवर बंदी घातली असून मंडळांना त्यांच्या मंडपातील गणरायाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा नामांकित, नवसाच्या गणरायाचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे प्रमुख निर्णय महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

मुंबईः प्रतिनिधी महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. १८७ मेगावॅट …

Read More »

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? शिवसेनेच देऊळ बंदीच अभियान-आशिष शेलार

मुंबईः प्रतिनिधी काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, …

Read More »

NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी ५ लाख रूपयांची लाच देवू केल्याचा आरोप एका सायबर एक्सपर्टने केल्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे आणखी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक …

Read More »

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठ तयार करणार अभ्यासक्रम केंब्रिज आणि महापालिकेदरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहमती- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई …

Read More »

शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी

मुंबईः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित …

Read More »