मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा …
Read More »टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस …
Read More »मराठा आरक्षण निकालाच्या अभ्यास समितीचा अहवाल ३१ मे पर्यत येणार मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून …
Read More »मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती …
Read More »कोरोनामुळे अंधत्व अर्थात म्युकरमायकोसीसवरील १ लाख इंजेक्शनची खरेदी करणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनामुळे अंधत्व …
Read More »पेरणीपूर्वी बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात …
Read More »भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश – बिहार रामभरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते …
Read More »माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय पाठोपाठ आता ईडीही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडीचे सत्र सुरु
मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल …
Read More »सरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर जिल्हा स्तरावर टास्क फोर्स-महिला व बालविकास विभागाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोवीड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. …
Read More »म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर राज्य सरकार करणार मोफत उपचार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
जालना : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात यणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद …
Read More »
Marathi e-Batmya