Editor

ईव्हीएम मशिन्स हँक करून गडबड केली जावू शकते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना भीती

मुंबईः प्रतिनिधी लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात …

Read More »

उध्दव ठाकरे, संजय राऊत यांना अटक करा मराठा क्रांती मोर्चा व्यंगचित्र प्रकरण न्यायालयाचे आदेश

पुसदः प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाने राज्यभर क्रांती मोर्चे काढले. या दरम्यानच्या काळात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात क्रांती मोर्चाचे विडंबन होणारे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. या व्यंगचित्रप्रकरणी पुसद न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दै.सामनाचे संपादक संजय राऊत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, राजेंद्र भागवत यांच्याविरोधात पुसद न्यायालयाने अटक …

Read More »

मुलींवरील अत्याचाराबाबत काँग्रेस नेत्यांचे विकृत वक्तव्य भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी लैंगिक शोषण झालेल्या मुलींच्या पालकांना पोस्कोअंतर्गत लाखो रुपयांची भरपाई मिळणार असल्याने अधिक पालकांनी तक्रारी केल्या, असे अत्यंत विकृत व घृणास्पद वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले असून आपण त्याचा निषेध करतो, असे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी मंगळवारी सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष …

Read More »

पन्नास वर्षे सत्तेत राहण्याची दर्पोक्ती करणारा भाजप पराभवाच्या भीतीने ग्रासलेला! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी २०१४ च्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ विजय मिळवत गेलेल्या भाजपला आता लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या सभांना मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष जनतेला पाच वर्षातच नकोसा झाल्याचे चित्र दिसत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी …

Read More »

सर्व प्रवर्गातील पदोन्नत्या जैसे थे ठेवा सुट्टीकालीन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी शासकिय नोकऱ्यांमधील एससी,एसटी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत सोपविण्यात आलेला आहे. तरीही यासंदर्भात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर एससी, एसटी, ओबीसीसह सर्व प्रवर्गातील पदोन्नती आरक्षण देण्यासंदर्भात जैसे थे चे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. यासंदर्भातील एक याचिका न्यायमूर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायमूर्ती …

Read More »

१४ मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७० टक्के मतदान कोल्हापूरात दुपारपर्यंत ४२ टक्के मतदान

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. तर सर्वाधिक मतदान कोल्हापूरात झाले आल्याचे त्यांनी सांगितले. १४ लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव ३३.१२ टक्के, रावेर ३५.१५ टक्के, जालना ३७.९१ टक्के, …

Read More »

माथाडी कामगारांना लुटणारा कि साताराला अविकसित ठेवणारा ? साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

साताराः प्रतिनिधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यातच साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज रहात असल्याने येथील स्थानिक राजकारणाबाबत राज्यातील जनतेला नेहमीच उत्सुकता लागू राहीली आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून छत्रपतींचे वंशजांकडे लोकप्रतिनित्व असूनही जिल्ह्याचा विकास झालेला नाही तर याच भागातील माथाडी कामगारांच्या नावावर स्वतःचे घर …

Read More »

आम्ही फक्त मराठा उमेदवारांच्या मागे मराठा क्रांती मोर्चा संयोजकांच्या निर्णयामुळे समाजात फाटाफूट

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उमेदवारांना पुढील राजकिय भवितव्य लक्षात घेवून अनेक सामाजिक संघटनांमध्ये पाठिंबा देण्याची चढाओढ लागली. मात्र विरोधकांना डावलत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मुक मोर्चे काढले. परंतु पक्ष न पाहता फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेतली. मात्र या …

Read More »

काँग्रेस मधून आ.अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

जालना : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या पक्षाविरोधात भूमिका केल्यामुळे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची अधिकृत घोषणा माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी भोकरदन येथे जालना लोकसभेचे काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केली. काँग्रेस मध्ये असताना त्यांना मानसन्मान दिला. मात्र त्यांनी पक्ष …

Read More »

प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने शहिदांना शाप आणि सईद हाफिजला उ:शाप; हीच भाजपची नीती- आ. आव्हाड

ठाणे: प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रज्ञासिंग ठाकूर यांना साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. जर प्रज्ञासिंग हिच्या शापाने करकरे यांचा मृत्यू होत असेल तर सईद हाफीजला त्यांचा …

Read More »