मुंबई : प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी ९ गावे आजदे, सागाव, नांदविली, पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा ही गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली असून उर्वरित १८ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव …
Read More »राज्यातील सर्व खाजगी-सरकारी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्चपर्यंत बंद आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सर्व शासकिय आणि खाजगी शाळा, प्रशिक्षण केंद्रे ३१ मार्च अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने एका परिपत्रकान्वये जारी केले. मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूपासून आजारी पडणाऱ्या संख्येत …
Read More »नांदेडमधल्या कामेश्वरच्या धाडसाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी शिफारस
मुंबई: प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या १४ वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनातील त्यांच्या …
Read More »खुल्या प्रवर्गातील पदांमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीयांना पदोन्नती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील पदोन्नतीतील आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र सध्या खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यात येत असून त्यामध्ये मागासवर्गीयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिली. तसेच कायदेशीररित्या आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी ज्येष्ठ व निष्णात वकिलांची नेमणूक करण्यात आली असून पदोन्नतीतील …
Read More »दिशा कायदा विशेष अधिवेशनात मांडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सुरक्षा सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन …
Read More »राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन
मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …
Read More »लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास ब्रिटीश सरकारची परवानगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबई-भंडाराः विशेष प्रतिनिधी लंडन येथे राज्य सरकारने विकत घेतलेल्या आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिल्याची माहिती माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लंडन येथील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी चित्रपटगृहे, जीम, जलतरण तलाव अखेर बंद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी या पाच जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव आदी बंद करण्याचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत यासंदर्भात निवेदन वाचून दाखवित याविषयीचा …
Read More »प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी वर्षाला पाच कोटी देणार दूजाभाव केला नसल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी डोंगरी तालुक्याच्या निमित्ताने ज्या तालुक्यांना विकासासाठी ५० लाख मिळत होते, त्या तालुक्यांना १ कोटी रूपये देणार तर ज्या तालुक्यांना १ कोटी मिळतात त्यांना २ कोटी रूपये आणि मतदारसंघातील विकासकामासाठी आमदार निधी ३ कोटी रूपये असे मिळून वर्षाकाठी जवळपास ५ कोटी रूपयांचा निधी राज्यातील प्रत्येक तालुक्याला देणार असल्याची …
Read More »छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली विमानतळाला संभाजी महाराजांचे तर मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव
मुंबईः विशेष प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय १९९३ साली युती सरकारने घेतला होता. त्यानंतर आता शिवसेना सत्तेच्या प्रमुखस्थानी असतानाही शहराचे नामांतर संभाजीनगर न करता केवळ औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमाताने पारीत झाल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या …
Read More »
Marathi e-Batmya