मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत असल्याचा खुलासा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी एका लेखी निवेदनाच्या माध्यमातून केला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा …
Read More »अखेर शरद पवारांच्या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या वीजेला ५ रूपयांचा दर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल रात्री पार पडली बैठकीत
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी तयार केलेली वीज राज्य सरकारने खरेदी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर सरकारने प्रती युनिट ५ रूपये दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विशेष म्हणजे ५ रूपयांचा दर परवडत नसतानाही राज्य सरकारने पवारांच्या आदेशानुसार निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील …
Read More »पर्यटन विभागाच्या रिसार्टवरच मंत्री रावल यांचा अवैध कब्जा तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी मंत्री रावलांची हकालपट्टी करण्याची मलिक यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत असतानाच नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या मालकीचे असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्टवरच कब्जा केल्याचा दुसरा आरोप राष्ट्रवादी …
Read More »त्या तरूणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेपर तपासणीचे कृषीमंत्र्याचे आदेश वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषीमंत्र्यांनी दिली ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याच्या कृत्याची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शेटेने दिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठीच्या २०१३ च्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. कृषीमंत्र्यांना या …
Read More »‘फसणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळतेय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फसणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मंत्रालयात अविनाश शेटे या सुशिक्षित बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्देवी …
Read More »निर्णय घेत नसल्याने तरूणाचा मंत्रालयाच्या दारातच आत्महत्येचा प्रयत्न कृषी परिक्षेच्या निकालाबाबत निर्णय होत नसल्याने तरूणाचे कृत्य
मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातल्या धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अविनाश शेटे असं या तरुणाचं नाव असून अहमदनगरच्या राहणाऱ्या अविनाशने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र, त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या …
Read More »आठवले, आंबेडकरांना वगळून दलित संघटनांचा सरकारच्या विरोधात महामोर्चा भीमा कोरेगांव प्रकरणी संविधान परिवाराच्या नावाखाली निघणार मोर्चा
मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणा नंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विधानभवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्यावतीने संविधान परिवाराच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांना लांब …
Read More »पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा कृषीमंत्री फुंडकर यांनी आज घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा …
Read More »१४ महिन्यातील मोठ्या घसरणीने ४ लाख ९५ हजार कोटींचा फटका शेअर बाजार तिसऱ्या दिवशीही पुन्हा गडगडला
मुंबई: प्रतिनिधी जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशातील शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला. सलग सहाव्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची अक्षरक्ष दाणादाण उडाली. काही मिनिटातच अब्जावधी रुपयांचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सेन्सेक्स सकाळी उघडताना तब्बल १२७५ अंकांनी कोसळून ३३ हजार ४८२.८१ वर उ़घडला. तर निफ्टीही ३९० अंकांनी कोसळत १० हजार २८० वर उघडला. १४ महिन्यातील …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादी हे भाऊ-भाऊ पण आघाडीचा निर्णय हायकमांड घेणार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राजकारणात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन वेगवेगळे पक्ष असले तरी आम्ही भाऊ-भाऊ असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय दिल्लीतील हायकमांडकडून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूंकामध्ये भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या …
Read More »
Marathi e-Batmya